Pushpa 2 Starrer Allu Arjun Fees Not Charged Saam Tv
मनोरंजन बातम्या

Allu Arjun Pushpa 2 Fees: अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’साठी फी घेणार नाही?, पण तरीही कमावणार कोट्यवधी, वाचा सविस्तर...

Allu Arjun Pushpa 2 News: अल्लू अर्जुनने चित्रपटासाठी किती मानधन घेतले?, याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Pushpa 2 Starrer Allu Arjun Fees Not Charged

अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ येत्या २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर शुटिंगमधील अनेक फोटोज व्हायरल झाले होते. प्रेक्षकांना सध्या सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनने चित्रपटासाठी किती मानधन घेतले?, याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी फ्री काम केले आहे. त्याने कोणतीही फी घेतलेली नसून चित्रपट प्रदर्शनानंतर तो पैसे घेणार असल्याची माहिती मिळत आहे. चित्रपटाच्या एकूण कमाईतला ३३% वाटा अल्लू अर्जुन फी म्हणून घेणार आहे. अल्लू अर्जुनला या नफ्यामध्ये, डिजीटल आणि सॅटेलाईट राईटचे पैसेही मिळणार आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (Tollywood)

गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकल्याचीही माहिती मिळाली होती. चित्रपटाचे ओटीटी राईट्स नेटफ्लिक्सने (Netflix)विकत घेतले. चित्रपटाचे राईट्स तब्बल ८५ कोटी रुपयांना विकले आहे. तर पुष्पा: द राईजचे अर्थात पहिल्या भागाचे ओटीटी राईट्स ॲमेझॉन प्राईम व्हिडीओकडे आहे. अद्याप तरी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टरच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ला देशासह जगभरातल्या थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

‘पुष्पा: द राईज’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. ३५० कोटी ते ३७५ कोटींदरम्यान संपूर्ण जगभरामध्ये चित्रपटाने कमाई केली होती. ‘पुष्पा: द राईज’ प्रमाणेच ‘पुष्पा: द रुल’चीही बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा होत आहे. आता ‘पुष्पा: द रुल’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याची चांगलीच चर्चा होत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त चित्रपटामध्ये फहद फासिल, सुनील, प्रकाश राज, रश्मिका मंदान्ना, जगपती बाबू हे कलाकार दिसणार आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT