Pushpa 2 Update : झुकेगा नहीं..! पुष्पाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी ; अल्लू अर्जुनने शेअर केले अपडेट

Allu Arjun Share Post : अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने चित्रपटाविषयी मोठी अपडेट शेअर केली आहे.
Pushpa 2 Team Accident
Pushpa 2 Team AccidentSaam T
Published On

Pushpa 2 Shooting Started : पुष्पा या चित्रपटची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. चित्रपटातील गाणी आणि डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंड पाठ आहेत. रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांची मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने चित्रपटाविषयी मोठी अपडेट शेअर केली आहे. दोघांनीही इंस्टाग्रामच्या माध्यमातून चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असल्याचे सांगितले आहे. (Latest Entertainment News)

Pushpa 2 Team Accident
Gadar 2 Udd Jaa Kaale Kaava Released : सकीनाच्या निळ्या डोळ्यात हरवला तारा सिंग ; उड जा काले कावा गाणे पुन्हा प्रदर्शित

अल्लू अर्जुन त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या पुष्प चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर 'बिगिन्ज' (सुरुवात) असे लिहिले आहे. तर रश्मिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीला शूटिंगचे झलक शेअर केली आहे.

पुष्प हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला होता. १७ डिसेंबर, २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा सिक्वेल येणार असे पहिल्या भागात सांगण्यात आले होते.

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्प २'चा फास्ट लूक प्रदर्शित करणार आला होता. तर पुष्पाच्या फास्ट लूकमध्ये अल्लू अर्जुनला कालीमातेच्या रूपात दाखविण्यात आला आहे.

अल्लू अर्जुनच्या या पोस्टवर दिशा पाटणी, आदिनाथ कोठारे सह अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. तसेच अल्लू अर्जुनाचे चाहते देखील त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत, असे त्यांनी कमेंट करत सांगितले आहे.

पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला होता.

रश्मिकाने नुकतेच ऍनिमल या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहहे. या चित्रपटामध्ये रश्मिका रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com