मनोरंजनाचा धमाका! फुकटात पाहाता येणार OTT वरील सीरिज; Netflix, Amazon Prime Subscription ची गरज नकोच

OTT Platforms : लाखो युजर्स पासवर्ड शेअरिंगच्या मदतीने OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग करतात.
JustWatch OTT Platform
JustWatch OTT PlatformSaam Tv
Published On

JustWatch Platform :

Netflix, Amazon Prime आणि Disney Plus Hotstar हे भारतातील प्रमुख ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहेत. भारतात, लाखो युजर्स पासवर्ड शेअरिंगच्या मदतीने OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग करतात. पण काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सने भारतातील पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद केली, त्यानंतर लोकांना सबस्क्रिप्शन (Subscription) प्लान विकत घ्यावा लागला. तथापि, असे काही मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर विनामूल्य स्ट्रीमिंग करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Netflix आणि Amazon Prime चे सबस्क्रिप्शन घेताय? थांबा ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. Netflix, Amazon Prime सध्या बरेच महागले आहेत. त्या आधी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे बरेच पैसे (Money) वाचवू शकता.

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या अॅपमध्ये चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन घेता त्या एवजी आता कोणतेही सबस्क्रिप्शन न घेता तुम्ही तो चित्रपट सहज मोफत पाहू शकता. आता तुम्ही विचार करत असाल की पैसे न देता कोणताही चित्रपट बघू शकतो हे कसे शक्य आहे? जाणून घ्या हे कसे शक्य होऊ शकते.

JustWatch OTT Platform
OTT Release This Week: चित्रपटप्रेमींसाठी OTT वर स्पेशल मेजवानी; ॲक्शन, ड्रामा अन् रोमान्सने भरलेले चित्रपट आणि वेबसीरिज होणार रिलीज

JustWatch या प्लॅटफॉर्मचे अनेक फायदे आहेत. वास्तविक, येथे तुम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता. JustWatch हे असेच एक प्लॅटफॉर्म आहे जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही जस्टवॉचवर सर्व चित्रपट आणि वेब सिरीज मोफत पाहू शकता. येथे त्या सर्व वेब सिरीज आणि चित्रपट उपलब्ध आहेत ज्या कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येतात.

या प्लॅटफॉर्मच्या मदतीने, तुमच्यासाठी चित्रपट आणि वेब सिरीज शोधणे खूप सोपे होते. त्याच्या मदतीने, सहजपणे शोधू शकता की कोणती वेब सिरीज आणि चित्रपट कुठे उपलब्ध आहेत. यानंतर ते तुम्हाला थेट त्याच प्लॅटफॉर्मवर transferred करेल.

JustWatch OTT Platform
Top Marathi Serial On OTT: टिव्हीवरच नाही तर ओटीटीवरही ‘ठरलं तर मग’चीच हवा; ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘ठिपक्यांची रांगोळी’ आहे इतक्या क्रमांकावर

जर एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज कुठेतरी विनामूल्य उपलब्ध असेल, तरीही तुम्ही ते सहज पाहू शकता. जेव्हाही एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज विनामूल्य उपलब्ध असेल तेव्हा तुम्हाला एक सूचना मिळेल आणि त्यानंतर तुम्ही ते सहजपणे वापरू शकता. एकूणच हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com