Samantha Ruth Prabhu SAAM TV
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu : Stop It Guys! सामंथा पापाराझींवर का भडकली? पाहा व्हायरल VIDEO

Samantha Angry Video : साऊथ सुपरस्टार समांथा रुथ प्रभूचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सामंथा पापाराझींवर भडकताना दिसत आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

साऊथ सुपरस्टार समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. अशात आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये समांथा रुथ प्रभू पापाराझींवर भडकताना दिसत आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

नुकतीतच समांथा रुथ प्रभू मुंबईत वांद्रे येथे जिमच्या बाहेर स्पॉट झाली. तेव्हा पापाराझी तिचे फोटो घेत होते. तिला 'गुड मॉर्निंग' बोलून शुभेच्छा देत होते. मात्र तेव्हा समांथा पापाराझींवर भडकली. समांथा जिमच्या बाहेर येताना कोणाशी तरी फोनवर बोलत होती. आपल्या गाडीच्या जवळ आल्यावर तिने फोन ठेवली आणि रागात पापाराझींना "स्टॉप इट गाइस प्लीज" असे म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जिम बाहेर समांथा रुथ प्रभू गडद तपकिरी रंगाच्या जिम आउटफिटमध्ये पाहायला मिळाली. नो मेकअप लूक, हाय पोनीटेल आणि कानात रिंग घालून तिने लूक पूर्ण केला होता. तिच्या हातात दोन बॉटल पाहायला मिळाल्या. तर ती फोनवर बोलत होती. तिच्या पापाराझींवर चिडण्यामागे नेमकं कारण अद्याप समजले नाही आहे. मात्र या व्हिडीओमुळे समांथाच्या आयुष्यात काहीतरी बिघडले असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.

फोनवर बोलताना समांथाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत आहे. अचानक तिचा मूड खराब होताना दिसतो आणि काही तरी गंभीर घडल्यासारखे वाटते. समांथा रुथ प्रभूच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स येत आहेत. काहीजण तिच्या वागण्यावर नाराज झाले आहेत. तर काहीजण तिची काळजी करताना दिसत आहेत. सध्या समांथा रुथ प्रभूचे नाव दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी जोडलं जात आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचला विश्वास कुमार, पण मानसिक धक्क्याने हदरला

Itchy Nose Relief: नाकात वारंवार खाज येते? 'या' उपायांनी घरच्या घरी सहज आराम मिळवा

Skin Care: मेकअपशिवाय मिळवा नेचरल पिंक ग्लो, फोलॉ करा या टिप्स

Food Infection: फूड पॉइजनिंगची लक्षणं कोणती? तब्येत बिघडल्यावर कशी काळजी घ्याल?

Sambhaji brigade : गायकवाडांना एकट्यात गाठून हल्ला करणे नामर्दाची #@&^%; काळं फासल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक, भाजपवर केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT