Rashmika Mandanna SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna : 'सिकंदर'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला रश्मिका मंदाना पडता पडता वाचली, पाहा व्हायरल VIDEO

Rashmika Mandanna Viral Video : सध्या सर्वत्र 'सिकंदर' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात 'सिकंदर'च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना पडता पडता वाचली. तेव्हा नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

Shreya Maskar

साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) सध्या 'सिकंदर' (Sikandar ) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. ती पहिल्यांदा भाईजान सलमान खानसोबत काम करत आहे. नुकताच 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला आहे. 'सिकंदर'चा ट्रेलर पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच आतुर झाले आहेत. ट्रेलर लाँचला सलमान खानसोबत रश्मिका मंदाना देखील उपस्थित होती.

ट्रेलर लाँच दरम्यानचा रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'सिकंदर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा काल (23 मार्च)ला मुंबईत पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी हजेरी लावली होती. ट्रेलर लाँच दरम्यान रश्मिका मंदाना स्टेजवर चढतानाचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदाना स्टेजवर चढताना पडता पडता वाचताना दिसत आहे. रश्मिकाने ट्रेलर लाँच सोहळ्याला एक खास लूक केला होता. तिने काळ्या रंगाचा शर्ट आणि स्कर्ट परिधान केला होता. रश्मिका या लूकमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती. मात्र या ड्रेसमुळे पडता पडता वाचली.

स्टेजवर चढताना रश्मिकाचा ड्रेस पायामध्ये येतो त्यामुळे ती अडखळते आणि पडता पडता वाचते. तेव्हा रश्मिका स्वतःला पटकन सावरते. तर तिच्या मदतीला एक हात पुढे येतो. त्यानंतर रश्मिका थोडी थांबते आणि मग स्टेजवर येते. 'सिकंदर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर आता चित्रपट ॲडवान्स बुकिंगमध्ये किती कोटींचा व्यवसाय करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'सिकंदर' मध्ये सलमान (Salman Khan), रश्मिकासोबतच काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर आणि 'बाहुबली' चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'सिकंदर' 30 मार्चला गुढीपाडव्याला रिलीज होणार आहे. तर सोमवारी 31 मार्चला ईद साजरी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT