Rashmika and vicky in chhaava
Rashmika and vicky in chhaavaSaam Tv

Chhaava Cast: 'छावा'साठी विकी आणि रश्मिका नव्हे तर; 'ही' जोडी होती पहिली पसंती 'या' सुपरस्टारने ऑफर नाकूरन केली चूक

Chhaava Movie Cast: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. चित्रपट चांगला गाजत आहे आणि विकी कौशल आणि रश्मिका मंदानाने या चित्रपटात खूप छान अभिनय केला आहे.
Published on

Chhaava Cast: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. चित्रपट चांगला गाजत आहे आणि विकी कौशलने या चित्रपटात खूप छान अभिनय केला आहे. विकीसोबत रश्मिका मंदान्ना देखील या चित्रपटात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे दोन्ही स्टार या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हते. यासाठी आधी दोन कलाकारांना ऑफर देण्यात आली होती.

विकीपूर्वी 'या' अभिनेत्याला ऑफर

हॉलिवूड सुपरस्टारच्या वृत्तानुसार, हा चित्रपट प्रथम टॉलीवूड सुपरस्टार महेश बाबू यांना ऑफर करण्यात आला होता. पण त्यानी खास रस दाखवला नाही. महेश बाबूच्या नकारानंतर, दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी विकी कौशलला हा चित्रपट ऑफर केला.

Rashmika and vicky in chhaava
Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची गर्जना; पण, अर्जुन कपूरच्या पदरी यावेळी ही निराशाच

रश्मिकाच्या जागी 'या' अभिनेत्रीला ऑफर

रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाने साकारलेल्या येसूबाईंच्या भूमिकेसाठी कतरिना कैफला पहिल्यांदा संपर्क साधण्यात आला होता. पण तीही काही कारणास्तव चित्रपटाला हो म्हणू शकली नाही आणि मग रश्मिका या चित्रपटाचा भाग बनली.

Rashmika and vicky in chhaava
Chhaava Movie 'छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य...'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'छावा'चे कौतुक

'छावा' हा एक पीरियड ड्रामा चित्रपट होता यामध्ये विकीने संभाजी महाराजांची भूमिका केली आहे आणि रश्मिकाने त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारली आहे. या दोघांशिवाय, चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता हे देखील होते.

पंतप्रधानांनी केले कौतुक

अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेले आहे. सध्या छावा चित्रपट देशभरात गाजत आहे. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या शौर्याची ओळख या स्वरूपात करून देण्यात आली आहे. छावाने आतापर्यंत २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. मध्य प्रदेश आणि गोव्यातही हा चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com