Jawan Film Nayantara  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nayanthara Jawan Look: नयनताराने थेट किंग खानसाठी सोडली १६ वर्ष जुनी अट; ‘जवान’साठी करणार नवा लूक

‘जवान’ चित्रपटासाठी शाहरुख सोबतच नयनताराने देखील विशेष मेहनत घेतली आहे.

Chetan Bodke

Jawan Film Nayantara: सध्या शाहरुख खान आपल्या आगामी चित्रपटांमुळे बराच चर्चेत आहे. शाहरुखचे या वर्षात तीन चित्रपट प्रदर्शित होत आहे. लवकरच त्याचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘जवान’ चित्रपटात शाहरुखसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुख सोबतच नयनताराने देखील विशेष मेहनत घेतली आहे. नयनतारा शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटासाठी तब्बल १६ वर्षानंतर स्वतःने घातलेली अट मोडीत काढणार आहे.

व्ही सिनेमाला मिळालेल्या माहितीनुसार, नयनतारा या चित्रपटासाठी एक स्विमिंग सूट परिधान करणार आहे. या परिधान केलेल्या सूटमध्ये ती अनेक वर्षानंतर दिसणार आहे. अभिनेत्रीने करियरच्या सुरवातीच्या काळामध्ये बिकिनी परिधान केली होती. २००७ साली तिने एका दाक्षिणात्य चित्रपटात स्विम सूट परिधान केला होता. मात्र स्वतःच तिने घातलेली ‘नो बिकिनी’ ही अट ती आता शाहरुखसाठी तोडणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

‘पठान’मध्ये दीपिकाच्या भगव्या बिकिनीने चांगलाच वाद निर्माण झाला होता. इतका वाद पेटला असला तरी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. शाहरुखने तब्बल चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक केले. शाहरुखचा ‘पठान’ नंतर ‘जवान’ हा दुसरा बिग बजेट चित्रपट असणार आहे. ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली हे करत आहेत.

चित्रपटात शाहरुख आणि नयनतारा बरोबर अभिनेता विजय सेतुपतीदेखील प्रमूख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. या चित्रपटातील शाहरुखच्या फर्स्ट लूकचे सर्वांनीच तोंड भरून कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT