Bai Vadyatun Ja Drama: आपल्या विशिष्ट हास्यशैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता दिगंबर नाईक सध्या एका नाटकामुळे चर्चेत आहे. त्या नाटकातील बाईने त्याला कमालीचं हैराण केलंय. आता तो थेट त्या बाईला ‘बाई वाड्यातून जा’ असं तो म्हणतोय. ही बाई नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे आपल्याला २९ मार्चला अर्थात आज संध्याकाळी कळणार आहे.
अभिनेता दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील यांचा आगमी ‘बाई वाड्यातून जा’ हे धमाल विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या बुधवारी २९ मार्चला आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे हे नाटक आहे. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे.
या नाटकाची कथा एका जुन्या वाड्या भोवती फिरते. हा वाडा विकायचा असतो. तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो? याची धमाल कथा ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील या दोघांसोबत या नाटकात भूषण घाडी, दीपा माळकर, भावेश टिटवळकर, अश्वजीत सावंतफुले आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
तब्बल चार वर्षांनी ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून आपल्याला हसवायला सज्ज झालेले दिगंबर नाईक सांगतात, पुष्पगुच्छ जसा निरनिराळ्या फुलांनी समजलेला असतो तसंच हे नाटक सजलयं. धमाल मनोरंजन करणारं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास अभिनेते दिगंबर नाईक व्यक्त करतात.
तीन वेगळ्या जॉनरची गाणी या नाटकात असून गायक अश्मिक पाटील ,कविता राम यांचा स्वराज गाण्यांना लाभला आहे. संगीत सुशील कांबळे यांचे आहे.नेपथ्य वैभव पिसाट तर प्रकाशयोजना सौरभ शेठ यांची आहे. नेपथ्य निर्माण महेश धालवलकर यांचे आहे. रंगमंच व्यवस्था सचिन सावंत तर व्यवस्थापन जयेश निकम ह्यांचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.