HBD Vijay Sethupathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Vijay Sethupathi: कधी सेल्समन तर कधी फोन बूथ ऑपरेटर, साऊथचा कॉमन मॅन बनला सुपरस्टार

Vijay Sethupathi Net Worth: चित्रपट निर्माता विजय सेतुपतीचा आज वाढदिवस आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची एकूण संपत्ती किती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचा (Vijay Sethupathi) आज (16 जानेवारी)ला वाढदिवस आहे. आज अभिनेता 47 वर्षांचा झाला आहे. त्याने साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली आहे. विजय सेतुपती हा प्रसिद्ध अभिनेता आणि उत्तम चित्रपट निर्माता आहे.विजय सेतुपती इंडस्ट्रीत डाउन टू अर्थ स्वभावासाठी ओळखला जातो. विजय सेतुपतीला अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

करिअरची सुरूवात

विजय सेतुपतीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्याला रुपामुळे अनेक मोठ्या कामाच्या संधी मिळाल्या नाहीत. सुरुवातीच्या काळात विजय सेतुपतीने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी केली आहे. त्यानंतर त्याने फोन बूथ ऑपरेटर म्हणून देखील काम केले. 2010मध्ये रिलीज झालेल्या 'थेनमुर्क परुवाकाटरू' या चित्रपटातून विजय सेतुपतीला लोकप्रियता मिळाली.

विजय सेतुपती नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, साऊथ अभिनेता विजय सेतुपती एकूण 140 कोटींचा मालक (Net Worth) आहे. त्याचे 'विजय सेतुपती प्रोडक्शन' हाऊस आहे. तसेच त्याच्याकडे लग्जरी कार आहेत. विजय सेतुपतीचा चेन्नईमध्ये स्वतःचा बंगला आहे. ज्याची किंमत 50 कोटी रुपये आहे.त्याच्याकडे बीएमडब्ल्यू ही आलिशान कार आहे. ज्याच्या किंमत कोटींच्या घरात आहे. विजय सेतुपती एका चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेतो.

वैयक्तिक आयुष्य

अभिनेता विजय सेतुपती याने 2003मध्ये जेस्सीसोबत लग्नगाठ बांधली. यांना दोनं मुलं आहेत. ज्यांची नावे श्रीजा आणि सूर्या अशी आहेत. त्याचे पिज्जा, विक्रम वेधा हे चित्रपट खूप गाजले आहेत. त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT