Pushpa 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection: 'झुकेगा नहीं साला...' बॉक्स ऑफिसवर फक्त पुष्पा भाऊचं राज्य, भल्याभल्या चित्रपटांना पछाडलं

Pushpa 2 Box Office Collection Day 30: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. 30व्या दिवशी या चित्रपटाने किती कमावले जाणून घ्या.

Shreya Maskar

'पुष्पा 2 : द रूल' (Pushpa 2) चित्रपट रिलीज होऊन आता तीस दिवस पूर्ण झाले आहे. या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun ) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) यांची केमिस्ट्री चाहत्यांना भरपूर आवडली आहे. हा चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन आता तीस दिवस पूर्ण झाले आहेत.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा 2' सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हा चित्रपट सुरुवातीपासूनच विक्रम रचले आहेत. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३०

'पुष्पा 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 164.25 कोटींची बंपर कमाई केली होती. तर दहाव्या दिवशी 63.3 कोटी, विसाव्या दिवशी 14.5 कोटींची कमावले आहेत. चित्रपटाने रिलीजच्या पंचवीसाव्या दिवशी 16 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.

अखेर मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'ने तिसाव्या दिवशी 3.85 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने तीस दिवसात एकूण 1193.6 कोटी रुपये कमावले आहेत. आता लवकरच 'पुष्पा 2' चित्रपट भारतात 1200 कोटींचा गल्ला पार करेल. आता पुढे देखील 'पुष्पा 2'ची हवा कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.

'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पेड प्रीव्यूमध्ये 10.65 कोटी रुपयांची कमाई केली. 'पुष्पा 2' चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण, जवान चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर बाहुबली 2, स्त्री 2 ला देखील मागे टाकले आहे. 2021 मध्ये 'पुष्पा द राइज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT