Soundarya Suryavansham Death Controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Soundarya Suryavansham : 'सूर्यवंशम' फेम सौंदर्याचा खून झाला होता का? हत्येच्या चर्चांवर पतीने स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

Soundarya Death : 'सूर्यवंशम' चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारणाऱ्या सौंदर्याची मोहन बाबू या अभिनेत्याने हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. या एकूण प्रकरणावर सौंदर्याच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

Soundarya Death Controversy : अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम चित्रपटाचे अनेकजण चाहते आहेत. चित्रपटगृहामध्ये फ्लॉप ठरलेला हा चित्रपट टीव्हीवर सुपरहिट ठरला. सूर्यवंशममध्ये अमिताभ बच्चन हे दुहेरी भूमिकेमध्ये होते. या चित्रपटातील मुख्य नायिका सौंदर्याचा २००४ मध्ये मृत्यू झाला होता. तब्बल २२ वर्षांनी तिच्या मृत्यूबाबत खुलासा करण्यात आला आहे.

बंगळुरूमध्ये प्रचारादरम्यान विमान अपघातात सौंदर्या हिचा मृत्यू झाला. त्या वेळेस सौंदर्या गरोदर होती. दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते मोहन बाबू यांनी मालमत्तेच्या वादातून सौंदर्याची हत्या केल्याचा आरोप तेलंगणामधील चिट्टीमल्लू नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. त्याने यासंदर्भात तक्रार देखील केली.

या प्रकरणावर सौंदर्याचे पती जीएस रघू यांनी भाष्य केले आहे. 'मोहन बाबू आणि सौंदर्या यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या गोष्टी अफवा असून त्यांचे मी खंडन करतो. माझी दिवंगत पत्नी सौंदर्याकडून त्यांनी कोणत्याही प्रकारची मालमत्ता घेतलेली नाही', असे रघू यांनी तेलुगू ३६० ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले.

'मोहन बाबू यांना आम्ही २५ वर्षांपासून ओळखतो. मी त्यांचा खूप आदर करतो, आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे राहतो. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, मोहन बाबू सरांशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही, त्यामुळे अशा खोट्या बातम्या पसरवणे बंद करा', असे वक्तव्य मोहन बाबू यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

शिवसेना - मनसेची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन | Maharashtra Politics

Sonalee Kulkarni Full Name: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं पूर्ण नाव काय आहे? अनेकांना माहित नाही

Ajinkyatara Fort : 'अजिंक्यतारा किल्ला' साताऱ्यातील ऐतिहासिक ठिकाण, लहान मुलांसोबत एकदा भेट द्याच

Shirdi : शिर्डीत साईचरणी गुरुपौर्णिमा उत्साहात; 6 कोटी 31 लाखांचं दान | VIDEO

SCROLL FOR NEXT