Bollywood Singer Video  saam tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Singer Video : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक गंभीर आजाराशी देतोय झुंज; MRI-CT स्कॅनही केलं, नेमकं झालं काय?

Sonu Nigam Health Update : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून सर्वकाही सांगितले.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वातून चिंताजनक बातमी समोर

प्रसिद्ध गायकाची अचानक तब्येत बिघडली

MRI-CT स्कॅनही झाले

मनोरंजन विश्वातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमची तब्येत बिघडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून गायकाने आपले हेल्थ अपडेट चाहत्यांना दिले आहे. सोनू निगमने आपल्या सुरेल आवाजाने जगाला वेड लावले आहे. त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टला चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते.

सोनू निगम गेल्या काही आठवड्यापासून मज्जातंतूशी (nerves) संबंधित एका वेदनादायक समस्येशी झुंज देत आहे. सध्या त्याच्यावर उपचार देखील सुरू आहे. त्याला असह्य शारीरिक वेदना होत असूनही लाइव्ह कॉन्सर्टमध्ये (मुंबई) भाग घेताना दिसत आहे. गायकाने व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे, 'पिंच्ड नर्व्हज'चा (मज्जातंतू दबल्याचा) त्रास होत आहे. त्यांना अनेक टेस्ट देखील केल्या आहेत. तो म्हणाला की, "माझे मज्जातंतू दबले गेले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून मी एमआरआय (MRI) आणि सीटी (CT) स्कॅन करत आहे. तसेच, मी बरीच औषधेही घेत आहे...ज्यामुळे माझा आवाजही थोडा जड झालाआहे..."

सोनू निगम पुढे म्हणतो की, "फिजिओथेरपी खूप वेदनादायक होती. मी आता पेन किलरची औषधे खात आहे. त्यामुळे माझा घसाही थोडा जड झाला आहे..." तब्येत ठीक नसूनही सोनू निगमने आपला कार्यक्रम पूर्ण केला. यावरून त्याची कामाच्या प्रति आणि गाण्याबद्दलची निष्ठा पाहायला मिळते. गाण्यावरील प्रेम दिसून येते.

सोनू निगमने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. कमेंट्समध्ये एकीकडे त्याचे कौतुक करत आहे. तर दुसरीकडे त्याच्या तब्येतीसाठी काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT