Sonalee Kulkarni-Amruta Subhash  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni-Amruta Subhash Video : "बघा आली ही राणी…"; सोनाली कुलकर्णी-अमृता सुभाषच्या कातिल अदा, पाहा 'परिणती'चं नवीन गाणं

Parinati Movie New Song : सोनाली कुलकर्णीच्या 'परिणती' चित्रपटाचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्यात सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाषचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) लवकरच 'परिणती - बदल स्वतःसाठी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सोनाली एका खास भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ट्रेलर पाहून चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसोबत मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) देखील झळकणार आहे. नुकतेच चित्रपटातील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्यात अमृता आणि सोनाली हटके अंदाजात पाहायला मिळत आहेत.

गाण्याचे नाव काय?

सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाषच्या 'परिणती - बदल स्वतःसाठी' (Parinati ) चित्रपटातील नवीन गाण्याचे नाव 'राणी' असे आहे. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सशक्त आणि आत्मनिर्भर स्त्रियांच्या आयुष्याभोवती चित्रपटाची कथा पाहायला मिळत आहे. गाण्याच्या व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "नाजूक तिच्या अदांनी, पाजायला पाणी, बघा, बघा, बघा आली ही रानी…"

चित्रपटाची रिलीज डेट

सोनाली आणि अमृताच्या गाण्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. 'परिणती - बदल स्वतःसाठी' हा चित्रपट 1 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैशाली माडे आणि प्राजक्ता शुक्रे यांनी हे गाणे गायले आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष पहिल्यांदाच एक स्क्रीनवर पाहायला मिळणार आहेत.

'परिणती - बदल स्वतःसाठी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अक्षय बाळसराफ यांनी केले आहे. चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या नवीन चित्रपटाचे नाव काय?

परिणती - बदल स्वतःसाठी

'परिणती - बदल स्वतःसाठी' चित्रपटाची रिलीज डेट काय?

1 ऑगस्ट

सोनाली कुलकर्णीसोबत 'परिणती'मध्ये कोणती अभिनेत्री झळकणार आहे?

अमृता सुभाष

सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या नवीन गाण्याचे नाव काय?

राणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Walking: वजन कमी करण्यासाठी १० हजार पावलं चालता? मग, ब्रेक घ्यावा की सलग चालावं, जाणून घ्या योग्य पद्धत

Maharashtra News Live Update : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर लोखंडी पाईप कोसळला

Gauri Kulkarni: गौरी कुलकर्णीचं खास फोटोशूट; जांभळ्या साडीत खुललं सौंदर्य, साधेपणात खुलला स्टायलिश अंदाज

Divorce Case : पतीला जाडा किंवा काळा बोलणं घटस्फोटाचं कारण मानलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT