Parinati movie: अमृता - सोनाली पहिल्यांदाच झळकणार एकत्र; परिणीतीमध्ये दिसणार लढणाऱ्या दोन स्त्रियांची कहाणी

Parinati Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत आजवर सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.
Parinati Marathi Movie
Parinati Marathi Movie
Published On

Parinati Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत आजवर आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरूला यांनी केली आहे.

या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन स्त्रिया दिसत असून एक रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक वेगळा आकर्षक बाणेदारपणा तर दुसरी साधेपणात गुंतलेली, कुशीत विसावलेली.

Parinati Marathi Movie
Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी यांचे ७ बेस्ट कॉमेडी चित्रपट एकदा नक्की बघा

त्यांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वाचा संगम चित्रपटाच्या आशयाची झलक देतो. सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या दोन स्त्रियांची ही कहाणी आहे, त्यांच्या लढ्याची कारणं वेगळी आहेत, परंतु दोघींचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे स्वतःसाठी बदल घडवणे.

Parinati Marathi Movie
Celebrity Private Jets: या बॉलिवूड स्टार्सकडे आहेत स्वत:चा प्रायव्हेट जेट

या चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, ‘’ ‘परिणती’ या चित्रपटात मी अशा दोन स्त्रियांना एकत्र आणलं आहे, ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते. सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. ‘परिणती’ ही त्यांच्या वाटचालीची, बंडाची, आणि स्वतःला सापडण्याची कहाणी आहे. ‘परिणती’ प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच देणार नाही, तर विचारही करण्यास भाग पाडेल.’’

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com