Sonakshi Sinha  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha : सोनाक्षीनं दिला दीपिकाला पाठिंबा, ८ तास काम करण्याबाबत नेमकं काय म्हणाली?

Sonakshi Reacts To Deepika 8 Hours Shift Demand : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दीपिका पदुकोणच्या आठ तास काम करण्याच्या मागणीवर आपले स्पष्ट मत दिले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कायम तिच्या कामामुळे चर्चेत असते. मात्र सध्या ती 'स्पिरिट' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, असे बोले जाते की, दीपिका पदुकोणला स्पिरिट चित्रपटातून काढण्यात आले. कारण तिने जास्त फी आणि ८ तासांची शिफ्ट मागितली होती. यावर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली होती. अशात आता यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) आपले स्पष्ट मत मांडले आहे.

सोनाक्षी सिन्हाने दीपिका पदुकोणला पूर्ण पाठिंबा दिला आहे. सोनाक्षी सिन्हाने या प्रकरणी तिचे स्पष्ट मत सांगितले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली की, "दीपिकाने 'स्पिरिट' चित्रपटातून एक्झिट घेतली की नाही मला माहित नाही. पण जर आठ तासांची शिफ्ट न मिळाल्यामुळे तिने असे केले असेल तर ते अगदी बरोबर आहे. मी अशा कलाकारांसोबत काम केले आहे जे आठ तासांपेक्षा जास्त काम करत नाहीत. त्यामुळे, महिला कलाकारांसाठीही हे वेगळे का असावे हे मला समजत नाही? कामाचे आठ तासांचे वेळापत्रक बनवावे. "

सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली, "मी इंडस्ट्रीत माझ्यापेक्षा कमी तास काम करणाऱ्या आणि जास्त काम करणाऱ्या लोकांसोबत काम केले आहे. जर एखाद्या चित्रपटात तुम्हाला फिट राहण्याची आवश्यकता असेल तर 12 ते 14 तास सेटवर काम करून व्यायाम करणे कसे शक्य आहे? पण माझ्या भूमिकेसाठी जास्त मेहनत नसेल तर मी 12 तासांची शिफ्ट आनंदाने करेन. त्यामुळे कामाच्या पद्धतीत थोडे बदल खूप गरजेचे आहेत. "

नेमकं प्रकरण काय?

दीपिका पादुकोण दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' चित्रपटात काम करणार होती. प्रेगन्सीनंतर दीपिका पुन्हा चित्रपटात दिसणार होती. मात्र अशात तिच्या चित्रपटातून एक्झिटची बातमी समोर आली. याचे मुळ कारण आठ तासांशी शिफ्ट ठरले. दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबर आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची मागणी केली आणि हे दिग्दर्शकाला मान्य नसल्यामुळे दीपिकाने चित्रपट सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi Phaphda Recipe: संंध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा खमंग गरमागरम जिलेबी फाफडा

Coconut Price Hike : पुण्यात खोबऱ्याचे दर वाढले, जाणून घ्या प्रति किलोचे दर

Sanjay Shirsat: संजय शिरसाटांच्या घरासमोर मद्यपी तरुणाचा गोंधळ, घरात घुसण्याचा प्रयत्न अन्...; पाहा व्हायरल व्हिडिओ

Maharashtra Live News Update: नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार, मालेगावात 'नारीशक्ती'ने काढला मोर्चा

Jalgaon : गृहराज्यमंत्री, कृषीमंत्री व जलसंपदा मंत्र्यांच्या फोटोला लावला चुना; ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

SCROLL FOR NEXT