Jasmin Bhasin Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jasmin Bhasin Rape Threat : बिग बॉस फेम अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव, बलात्काराची धमकी मिळाली होती...

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जास्मिन भसीन रोजच चर्चेत असते. बिग बॉस १४ मुळे जास्मिन खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जास्मिन भसीन(Jasmin Bhasin) रोजच चर्चेत असते. बिग बॉस १४(Big Boss) मुळे जास्मिन खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. सलमान खानच्या शोपूर्वी जस्मिन रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोचा भाग होती.

'बिग बॉस १४'मध्ये जस्मिनची नखरेबाज शैली चाहत्यांना आवडली. मात्र, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जास्मिनला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. एका मुलाखतीदरम्यान जास्मिनने सांगितले की, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर काही लोकांनी तिला बलात्काराची धमकीही दिली होती.

एका मुलाखतीत जास्मिन भसीनने बिग बॉसनंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाले हे सांगितले. जास्मिनने सांगितले की, नेटकऱ्यांनी तिला ट्रोलिंगसह शिवीगाळ केली आणि बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. या धमक्यांचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर खूप खोलवर झाल्याचे जास्मिनने सांगितले. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जास्मिनला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली होती. यावेळी जास्मिनला तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी चांगली साथ दिली.

मात्र, आता थेरपीनंतर जस्मिन भसीनवर सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा कोणताही परिणाम होत नाही. मुलाखतीत जस्मिन म्हणाली, 'जर लोक माझ्यावर प्रेम करतात, तर मी त्यांचा आदर करते. पण जर कोणी माझा तिरस्कार करत असेल तर ती त्यांची इच्छा आहे'.

जस्मिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जस्मिन भसीनने २०११ मध्ये 'वनम' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०१७ मध्ये ती झी टीव्हीच्या 'टशन ए इश्क' या मालिकेमध्ये दिसली होती. यानंतर ती २०१७ मध्ये कलर्स टीव्ही शो 'दिल से दिल तक' मध्ये दिसली होती. या शोमध्ये जास्मिनसोबत अभिनेत्री रश्मी देसाई आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला देखील होता. २०१९ मध्ये, जस्मिन रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' शोचा भाग होती. त्यानंतर अभिनेत्री २०२० मध्ये 'बिग बॉस १४'मध्ये सहभागी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Burj Khalifa : बुर्ज खलिफा येथील एका फ्लॅटची किंमत किती?

Maharashtra Live News Update: : - भंडाऱ्यातील तुमसर येथे गणपती बाप्पाचा धूम धडाक्यात विसर्जन

How to Clean Silver Anklets: चांदीचे अँकलेट किंवा पैंजण घरच्या घरी कसे स्वच्छ करावे, जाणून घ्या सोपी पद्धत

Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईची सत्ता मिळणं अवघड; कुणी केला दावा?

Woman Stabbed to Death: युद्धातून जीव वाचवून अमेरिकेत आली; ट्रेनमध्ये हल्लेखोराने चाकू भोसकला Video Viral

SCROLL FOR NEXT