सोशल मीडिया एन्फ्लूएंसर किली पॉल कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो नेहमीच मराठी, हिंदीसह अनेक भाषेतील गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतंच किली पॉलने आणखी एका मराठी गाण्यावर एक सुंदर व्हिडीओ बनवत चाहत्यांचे मने जिंकली आहे. त्याने 'चाकर शिवबाचं होणारं' या गाण्यावर एक रिल शेअर केला आहे. (Social Media)
किली पॉल आणि त्याची बहिण नीमा पॉल कायमच सोशल मीडियावर एकत्रित व्हिडीओ बनवत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओंची प्रचंड चर्चा होताना आपण अनेकदा पाहिलेली आहे. नुकतंच किलीने सोशल मीडियावर 'चाकर शिवबाचं होणारं' या गाण्यावर एक रिल शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, किलीने 'छत्रपती शिवाजी महाराज' असं कॅप्शन देत त्याने हा रिल शेअर केला आहे. आणि पुढे #kilipaul #india #maharashtra #maratha #dar #daressalaam असे हॅशटॅग वापरले आहे. (Song)
१ लाखांहून अधिक चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला असून चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचाही वर्षाव केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सने 'छत्रपती शिवाजी महाराज' असंच म्हटलं आहे. तर एकाने किली पॉल शिवरायांचा खरा मावळा आहे. अशी कमेंट केली. अनेकांनी त्याच्या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या रिल्सला नेटकऱ्यांची चांगलीच पसंदी मिळतेय. सोबतच, या रिल्समधील किलीच्या मराठमोळ्या अंदाजाचं अनेकजण कौतुक करत आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj)
सध्या सोशल मीडियावर किलीच्या बऱ्याच मराठी गाण्यांच्या व्हिडीओंची बरीच चर्चा होताना दिसते. "काय सांगू राणी मला गाव सुटना", "मावळं आम्ही वादळ आम्ही" आणि "नांदण नांदण रमाचं नांदण" या मराठी गाण्यांवरील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. किलीने आणि त्याची बहिण नीमाने 'बहरला हा मधुमास नवा', 'एका वाघाची शिकार एका हरणीने केली' या मराठी गाण्यांवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यांना सोशल मीडियावर उत्तम प्रतिसादही मिळाला होता. (Marathi Film)
किली पॉल आणि त्याची बहिण नीमा पॉलबद्दल सांगायचं तर, हे दोघेही टांझानियातील मुळचे रहिवासी असून काही दिवसांपूर्वी किली आणि नीमा भारतात सुद्घा आले होते. दोघांनाही सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. हे दोघेही बॉलिवूड आणि मराठी गाण्यांवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.