Snowdrop actress Park Soo-ryun dies at 29 : स्नोड्रॉप (Snowdrop) या लोकप्रिय शोमधून नाटकात पदार्पण केलेली कोरियन अभिनेत्री पार्क सू-र्यूनचे अपघातात निधन झाल्याची माहिती आहे. ती 29 वर्षांची होती. कोरियन न्यूज पोर्टल्सवरील वृत्तानुसार या अभिनेत्रीचा घरी जात असताना पायऱ्यांवरून खाली पडून मृत्यू झाला.
एका कोरियन मीडिया आउटलेटने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री पार्क सू-र्यून 11 जून रोजी कामावरून घरी जात असताना पायऱ्यांवरून खाली घसरली. ती बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि नंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पार्क सू र्युनच्या कुटुंबाने तिचे अवयव हॉस्पिटलमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभिनेत्री तिच्या दयाळू स्वभावासाठी आणि उदार वृत्तीसाठी ओळखली जात होती.
आईची भावनिक पोस्ट
पार्क सू र्युनच्या आईने एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, "फक्त तिचा मेंदू बेशुद्ध आहे आणि तिचे हृदय अजूनही धडधडत आहे. असं कोणीतरी नक्की असेल ज्याला अवयवांची नितांत गरज आहे. जर तिचे हृदय कोणासाठी कामी आले आणि धडधडत राहिले तर तिची आई आणि वडील म्हणून आम्ही आरामात जगू शकू".
मंगळवारी अत्यंसंस्कार
पार्क सू र्युन यांच्या पार्थिवावर मंगळवारी ग्योन्गी प्रोव्हिंशीअल मेडिकल सेटरच्या सुवॉन रुग्णालयात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या कुटुंबीय अंत्ययात्रा काढून तिच्यावर अंतिम संस्कार करणार आहेत. (Latest Entertainment News)
प्रभावी कारकिर्द
संगीत अभिनेत्री Park Soo-ryun हिचा जन्म 1994 मध्ये झाला आणि 2018 मध्ये तिने 'इल टेनोर' म्युझिकलमधून संगीतात पदार्पण केले. तेव्हापासून ती द डेज वी लव्हड आणि सिद्धार्थासारख्या संगीत नाटकांमध्ये सक्रिय झाली. JTBC ऐतिहासिक नाटक Snowdrop' मधील भूमिकेसाठीही ती ओळखली जात होती. याशिवाय BLACKPINK च्या Jisoo, Jung Hae In मुळेही ती प्रसिद्ध झाली. (Latest Marathi News)