आमिर खानचा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपट आता लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चढउतार पाहायला मिळत आहेत. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे.
आमिर (Aamir Khan ) आणि जिनिलियाचा (Genelia ) 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला रिलीज झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चित्रपट रिलीज होऊन आज 1 आठवडा पूर्ण झाला आहे. सात दिवसांत चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.
दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये
दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये
तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये
चौथा दिवस - 8.5 कोटी रुपये
पाचवा दिवस - 8.50 कोटी रुपये
सहावा दिवस - 7.25 कोटी रुपये
सातवा दिवस - 6.75 कोटी रुपये
एकूण - 89.15 कोटी रुपये
आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाला मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर' चित्रपटाने 7 दिवसांत 89.15 कोटी रुपये कमावले आहेत. तर जगभरात 132 कोटींचा व्यवसाय केला आहे. सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाने जगभरात 120 कोटींची कमाई केली असून भारतात 106 कोटी रुपये कमावले आहेत.
'सितारे जमीन पर' ही एक भावनिक कथा आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत असून तो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. या चित्रपटात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.