Singham Again  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singham Again : कमी बजेट असूनही 'या' चित्रपटाचा क्लायमॅक्स सर्वात महागडा, किंमत जाणून व्हाल थक्क

Shreya Maskar

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट बनले आहेत ज्यांचे बजेट ५०० कोटींपेक्षा जास्त आहे. प्रभासचा 'कल्की 2898 एडी' हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट मानला जातो. पण यावर्षी बॉक्स ऑफिसवर एक असा चित्रपट येणार आहे जो, कमी बजेट असूनही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या सीनचा विक्रम करणार आहे.

गेल्या काही वर्षांत 'जवान', 'आरआरआर' आणि 'कल्की 2898 एडी' सारखे बिग बजेट चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खानच्या 'जवान'चे बजेट 300 कोटी रुपये आणि राम चरणच्या 'RRR'चे बजेट 550 कोटी रुपये होते, तर प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चे बजेट 600 कोटी रुपये आहे. पण सर्वात महागड्या दृश्य असलेल्या चित्रपटाचे खिताब 250 कोटी रुपये बजेट असलेल्या चित्रपटाने घेतला आहे.

सिंघम अगेन

अजय देवगणचा (Ajay Devgn) 'सिंघम अगेन' (Singham Again) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या दृश्याचा विक्रम करणारा चित्रपट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रोहित शेट्टी ( Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा चित्रपट फक्त 250 कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या बजेटच्या 10 टक्के म्हणजेच 25 कोटी रुपये क्लायमॅक्स सीनसाठी खर्च करण्यात आले आहेत. याआधी कोणत्याही भारतीय चित्रपटात एका दृश्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च झाली नव्हती.

सिंघम अगेन कधी रिलीज होणार?

ॲक्शन सिनेमा सिंघम अगेन दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला दाखल होणार आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट नेमली आहे. सिंघम अगेनमध्ये अजय देवगणसोबत रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर आणि अर्जुन कपूर फुल ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT