Shreya Ghoshal  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreya Ghoshal: पहलगाम हल्ल्यामुळे अरिजित सिंगनंतर श्रेया घोषालने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Shreya Ghoshal: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. यामुळे गायक अरिजित सिंग आणि श्रेया घोषालने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Shruti Vilas Kadam

Shreya Ghoshal: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले, यामुळे देशभरात चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, गायक अरिजित सिंहने त्याचा कॉन्सर्ट रद्द केल्यानंतर प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनेही आपला सुरत येथील कॉन्सर्ट शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाचे चाहते समर्थन करत आहेत.

श्रेया घोषालने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या निर्णयाची माहिती दिली. तिने लिहिले, " पहलगाम येतील झालेल्या दुःखद घटनेमुळे सध्या आनंद साजरा करण्याचा योग्य वेळ नाही. आपण सर्वांनी एकजूट होऊन या कठीण काळात संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे." या निवेदनातून श्रेया घोषालने केवळ आपली व्यावसायिक बांधिलकीच नाही तर सामाजिक जबाबदारीही बजावली आहे, असे तिच्या चाहत्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अरिजित सिंगनेही याआधीच आपला शो रद्द करत या काळात शहीदांसाठी शोक व्यक्त केला आहे. देशभरात अनेक कलाकार, लेखक आणि क्रीडापटूंनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रेया घोषालसारख्या लोकप्रिय कलाकाराकडून आलेला हा निर्णय जनमानसात एक सकारात्मक संदेश देतो की राष्ट्रीय संकटाच्या वेळी मनोरंजनापेक्षा माणुसकीला आणि सहवेदनेला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

श्रेया घोषालच्या चाहत्यांनी तिच्या निर्णयाचा सन्मान करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. आयोजकांकडूनही सांगण्यात आले की लवकरच शोची नवीन तारीख जाहीर केली जाईल किंवा तिकीटाचे पैसे परत केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वादळाच्या पार्श्वभुमीवर मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या बंदर विभागाच्या सुचना

कृषी मंत्री दत्तात्रय भरणें समोर शेतकऱ्याला हुंदका आला दाटून, पाहा VIDEO

Red Alert : पुढचे काही तास महत्त्वाचे! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', अतिजोरदार पाऊस कोसळणार

Pune Garba: भाजप खासदारानं गरबा बंद पाडला; ऐन कार्यक्रमावेळी खासदाराची धाड

ना ओळख, ना पाळख! आईच्या डोळ्यासमोरच 5 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या; माथेफिरूच्या कृत्याने सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT