Singer Rishabh Tandon Died At The Age Of 35 Years Due To Heart Attack in Delhi on 21st October  Saam tv
मनोरंजन बातम्या

Singer Passes Away: प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Singer Death: प्रसिद्ध गायक-अभिनेता ऋषभ टंडन यांचे ३५ व्या वर्षी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. करवा चौथच्या काही दिवसांपूर्वी त्यांने पत्नीसोबतचे खास फोटो शेअर केले होते.

Shruti Vilas Kadam

प्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडन, ज्यांना स्टेजवर ‘फकीर’ म्हणूनही ओळखले जात असे, यांचे ३५ वर्षांच्या वयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दु:खद घटना २१ ऑक्टोबर २०२५ रोजी दिल्लीमध्ये घडली.

ऋषभ टंडन त्यांच्या पत्नी ओलेसिया नेडोबिगोवा टंडन यांच्यासोबत राहत होते. करवा चौथच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पत्नीसोबतचे प्रेमळ फोटो शेअर केले होते, जे त्यांच्या नात्याचे प्रतीक ठरले होते. त्यांच्या या शेवटच्या पोस्टनंतरच ही दु:खद घटना घडली.

ऋषभ टंडन ‘येश आशिकी’, ‘इश्क फकीराना’, ‘धुं धुं कर के’, ‘चाँद तू’ यांसारख्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात होते. गायक आणि अभिनेता म्हणून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पत्नी ओलेसियाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून ऋषभ यांना श्रद्धांजली अर्पण केली, ज्यात तिने लिहिले: “तुम्ही मला सोडून गेला, पण तुमची स्वप्ने मी पूर्ण करीन.”

झुबीन गर्ग यांचे निधन

आसामचा अभिमान असलेल्या झुबीन गर्ग यांच्या अचानक निधनाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध गायकाचे निधन सर्वांसाठी धक्कादायक आहे. ऋषभ टंडन यांनी २००८ मध्ये टी-सीरीजच्या संगीत अल्बम "फिर से वही" ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ऋषभ त्यांच्या आवाजाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Survival: ब्लॅंकेट, चादर नसताना पूर्वी लोक थंडीपासून कसे बचाव करायचे?

Maharashtra Live News Update: इंदापुरात कृषिमंत्री भरणे यांनी वाजवला गजेढोल

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? शरद पवार गट सोडणार काँग्रेसची साथ

WhatsApp: व्हॉट्सॲपचे 'हे' बेस्ट फिचर्स तुम्हाला माहित आहे का? प्रत्येकाने वापरलेच पाहिजे

Maharashtra Politics: पुण्यातील बड्या नेत्याने दिवाळीचा मुहूर्त साधला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सूचक पोस्ट

SCROLL FOR NEXT