Parineeti Chopra: 'सगळ्यात बेस्ट आईला...', राघव चड्ढा यांनी परिणीती चोप्राला खास स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Parineeti Chopra Birthday: राघव चड्ढा यांनी पत्नी आणि अभिनेत्री परिणीती चोप्राला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. त्यांनी तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Parineeti Chopra
Parineeti ChopraSaam Tv
Published On

Parineeti Chopra Birthday: अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा आज वाढदिवस असून, तिच्या पती आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर अतिशय खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. राघव यांनी आपल्या पत्नीचा बेबी बंप दिसणारा सुंदर फोटो अल्बम शेअर केला असून, त्यात दोघांच्या आयुष्यातील नव्या पर्वाचा आनंद शेअर केला आहे.

राघव यांनी इंस्टाग्रामवर काही फोटोज पोस्ट केले आहेत, यामध्ये परिणीती पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. त्या फोटोंमध्ये राघव तिच्या बेबी बंपवर हात ठेवताना आणि तिच्या कपाळावर किस करताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये राघव यांनी लिहिले आहे, " नवीन आणि सर्वात बेस्ट आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा! किती अविश्वसनीय प्रवास होता - गर्लफ्रेंड ते पत्नी आणि आमच्या लहान मुलाची आई."

Parineeti Chopra
Attack on Singer: 'यह तो बस शुरुआत है।', प्रसिद्ध गायकावर बेछूट गोळीबार, पोटाला लागली गोळी; हल्ल्यामागचं कारणही समोर

या प्रेमळ शुभेच्छांवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटी मित्रांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या कपलचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी लिहिलं, “तुम्ही दोघी एकत्र सुंदर दिसता.” तर काहींनी म्हटलं, “परफेक्ट कपल”

Parineeti Chopra
Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

राघव आणि परिणीती यांचा विवाह सप्टेंबर २०२३ मध्ये उदयपूर येथे पारंपरिक पद्धतीने झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांपूर्वीच या जोडप्याने आपल्या पहिल्या अपत्याच्या आगमनाची बातमी जाहीर केली होती. परिणीतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी एका गोड बाळाला जन्म दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com