Famous Singers saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Singers : लाईव्ह परफॉर्मन्सवेळी बॉलिवूड गायक स्टेजवरच कोसळला; VIDEO व्हायरल, नेमकं घडलं काय?

Mohit Chauhan Viral Video : प्रसिद्ध गायक मोहित चौहानचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात गायक गाताना स्टेजवर अचानक कोसळताना दिसत आहे.

Shreya Maskar

गायक मोहित चौहानचा भोपाळ येथे लाईव्ह परफॉर्मन्स सुरू होता.

मोहित चौहान लाईव्ह परफॉर्मन्स करताना अचानक स्टेजवर कोसळला.

मोहितचा लाईव्ह परफॉर्मन्सचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध गायक मोहित चौहान (Mohit Chauhan Viral Video) आपल्या सुरेल आवाजाने कायम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे लाईव्ह कॉन्सर्ट होत राहतात. असा एक लाईव्ह परफॉर्मन्स करतानाचा मोहित चौहानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मोहित चौहान लाईव्ह परफॉर्मन्स करताना स्टेजवर अचानक कोसळला, ज्यामुळे चाहते चिंतेत पडले आहे.

शनिवारी रात्री (7 डिसेंबर 2025) भोपाळ येथील एम्स येथे गायक मोहित चौहान यांच्या लाईव्ह परफॉर्मन्स सुरू असताना मोहित चौहान अचानक घसरून स्टेजवर पडला. मोहित चौहान रॉकस्टारमधील 'नादन परिंदे' गाणे गात असताना हा अपघात झाला. प्रेक्षकांसोबत गाणे गाताना स्टेजच्या लाईट्सजवळ येताच तो अचानक एका लाईटिंग फिक्स्चरला धडकला आणि त्याचा तोल गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. स्टेजवर काय घडले हे पाहून प्रेक्षक थक्क झाले.

मोहित चौहान स्टेजवर पडल्याचे समजताच काही क्षणातच आयोजक आणि सहकारी त्याचा मदतीला धावले आणि त्याला उचलले. त्यानंतर त्यांनी न थांबता पुन्हा गाणे सुरू केले. कार्यक्रमानंतर मोहित चौहानवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. मोहित चौहानचे अचानक असे स्टेजवर पडणे चाहत्यांसाठी धक्कादायक होते. गायक मोहित चौहान हे एम्स भोपाळ येथे आयोजित वार्षिक महोत्सव 'रेटिना ८.०' मध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करत होते. रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली.

कार्यक्रमानंतर व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि लवकर बरं होण्यासाठी मोहित चौहानला शुभेच्छा दिल्या आहेत. 'सद्दा हक', 'तुम से ही', 'इलाही' अशी अनेक सुपरहिट गाणी त्याने गायली आहेत. मोहित चौहानचे गाणे ऐकण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ ग्रामपंचायत निवडणूक, ८५०० ग्रामपंचायत सदस्यांना अंतिम आरक्षण

पावसाळ्यात कोणती फळे खावीत?

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

SCROLL FOR NEXT