Lawrence Bishnoi Gang  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lawrence Bishnoi Gang : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर; जिमवर केला गोळीबार, सलमान खानशी आहे खास कनेक्शन

Guru Randhawa Gym Firing - Lawrence Bishnoi Gang : प्रसिद्ध गायकाच्या जिमवर गोळीबार झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगने हल्ल्याची जबाबदारी घेतली.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाच्या जिमवर गोळीबार

गायकाचे सलमान खानशी आहे खास कनेक्शन

लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक गुरु रंधावाच्या (Guru Randhawa ) जिमवर गोळीबार करण्यात आला आहे. बुधवार रात्री उशिरा दिल्लीतील विहार भागात गुरु रंधावाच्या मालकीच्या जिमवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गायकाची बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी जवळील असल्यामुळे हा हल्ला केल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई टोळीने केला आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

टीव्ही९ हिंदीच्या वृतानुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले की, तोंडाला कापड बांधलेले दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून आले, त्यांनी '24HS फिटनेस' जिमच्या काचेच्या भागावर अनेक राऊंड गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले. गोळीबारानंतर लगेचच, बिश्नोई टोळीने हा हल्ला केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप आणि सोशल मीडिया पोस्ट ऑनलाइन शेअर केली. ही पोस्ट टोळीचे सदस्य टायसन बिश्नोई, आरझू बिश्नोई आणि हरी बॉक्सर यांनी शेअर केली.

व्हायरल पोस्टमध्ये नेमकी काय?

व्हायरल पोस्टमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, "24 HS फिटनेस दिल्ली गुरू रंधावाच्या जिममधील गोळीबार मी, अनिल पंडित यूएसए आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुपने केला आहे. तो सलमान खानच्या खूप जवळ जात होता. आम्ही त्याला आधीही समजावून सांगितले होते की, त्याच्यापासून दूर राहा, तो आपला शत्रू आहे. पण तो समजला नाही आणि आपले सर्व शत्रू कुठेही लपले असले तरी, आम्ही त्या सर्वांना लवकरच भेटू..." यासोबतच पुढे एक टीपही लिहिली आहे, "आणि हे सर्व गद्दार जे देशाविरुद्ध कट रचतात, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपले असले तरी, आम्ही त्यांना तिथेच ठार मारू..."

Guru Randhawa

ऑडिओमध्ये टोळीच्या एका कथित सदस्याने दावा केला की, सलमान खानशी असलेल्या जवळीकीमुळे गुरु रंधावाला टार्गेट करण्यात आले. त्या व्यक्तीने हल्ल्याचे वर्णन 'केवळ एक ट्रेलर' (झलक) असे केले आहे. मात्र पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओ क्लिप आणि सोशल मीडिया पोस्टची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.पोलीस हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत.पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करत आहेत.गुरु रंधावा यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

Election : ३ राज्यांमध्ये पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान आणि निकाल कधी?

पावसाळ्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! फक्त या 5 स्टेप्स करा फॉलो| Glowing Skin Tips

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती, बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार? वाचा

Pune Crime: नगरपरिषद कार्यालयाबाहेरच विरोधी पक्षनेत्यावर चाकू आणि चॉपरनं जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT