Badshah SAAM TV
मनोरंजन बातम्या

Badshah : बादशाहने खरेदी केली कोट्यवधींची कार, किंमत वाचून घाम फुटेल

Badshah Buy New Car : प्रसिद्ध गायक बादशाहाने नवीन कोरी लग्जरी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. कारची पहिली झलक पाहा.

Shreya Maskar

बादशाहाने नवीन कोरी लग्जरी कार खरेदी केली आहे.

बादशाहाच्या लग्जरी कारची किंमत 12 कोटींच्यावर आहे.

बादशाहाने खरेदी केलेली कार बॉलिवूडच्या मोजक्या सुपरस्टार्सकडे आहे.

प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचे गाण्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. तो एक लग्जरी आयुष्य जगत आहे. नुकतीच बादशाहने एक लग्जरी कार खरेदी केली आहे. जे पाहून तुमच्याही मनाला भुरळ पडेल. बादशाहने खरेदी केलेली कार भारतातल्या काही मोजक्या लोकांकडेच आहे.

बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट करून आलिशान कारची एक झलक दाखवली आहे. कारवर कस्टम नेम टॅग देखील लावण्यात आला आहे. त्यांने या व्हिडीओला खूपच हटके कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "Zen wale ladke" बादशाहच्या या व्हिडीओवर चाहते, कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कारचे नाव आणि किंमत?

रोल्स-रॉइस कलिनन सीरिज II ही जगातील लग्जरी एसयूव्हींपैकी एक आहे. बादशाहच्या नवीन कारचे नाव रोल्स-रॉइस कलिनन सीरिज II (Rolls-Royace Cullinan Series II) असे आहे. या कारची किंमत तब्बल 12.45 कोटी रुपये आहे.

कारची वैशिष्ट्ये

बादशाहने खरेदी केलेल्या नवीन लग्जरी कारमध्ये 6.75 लिटर ट्विन-टर्बो v12 इंजिन आहे. हे इंजिन 563 बीएचपी आणि 850 एनएम टॉर्क जनरेट करते. कारला 23 इंच ऑप्शनल व्हील्स आहेत. तसेच कारमध्ये इल्युमिनेटेडे ग्रिल, स्लिमर हेडलाइट्स देखील आहेत. भारतात अशा लग्जरी कार मुकेश अंबानी, अल्लू अर्जुन, शाहरुख खान यांसारख्या मोजक्या सुपरस्टार्सकडे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

SCROLL FOR NEXT