Badshah Photos: सुजलेला डोळा अन् मलमपट्टी; 'बादशाह'वर झाली शस्त्रक्रिया, सेटवर घडली होती भयंकर घटना

Badshah Injury : प्रसिद्ध गायक बादशाहाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Badshah Injury
Badshah PhotosSAAM TV
Published On
Summary

गायक बादशाहच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

गायकाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट करून दुखापतीची माहिती दिली आहे.

प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह (Badshah ) कायम त्याच्या हटके गाण्यांसाठी ओळखला जातो. आजवर त्याने अनेक गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्याची स्टाइल जगात प्रसिद्ध आहे. मात्र आता बादशाहच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी समोर आली आहे. नुकतीच बादशाहवर शस्त्रक्रिया पार पडली आहे. ज्याची माहिती त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. बादशाहला नेमकं काय झाले, जाणून घेऊयात.

बादशाहच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये बादशाहाचा डावा डोळा सुजलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या डाव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झालेली दिसून येत आहे. या फोटोंना बादशाहने एक कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "अवतार जी का मुक्का हिट करता है जैसे" बादशाहाच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहते त्याच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, बादशाहच्या डोळ्याला उत्तर अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या शो दरम्यान दुखापत झाली. त्याच्या डाव्या डोळ्याला कॉर्नियल अब्रेशन झाले. ज्याच्यावर त्याने उपचार घेतले. डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शोदरम्यान त्याच्या डोळ्यात काहीतरी गेले आणि त्याला दुखापत झाली. मात्र बादशाहने शो पूर्ण केला.

बादशाह नुकताच आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये झळकला. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अलिकडेच बादशाहने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. बादशाह आपले वजन कमी केले. ज्यामुळे तो आता अजून हँडसम दिसत आहे.

Badshah Injury
Lalit Prabhakar : प्रेमाची जादू पुन्हा पसरणार; 'आरपार'नंतर ललितचा नवा चित्रपट, 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com