ललित प्रभाकर 'आरपार'नंतर 'प्रेमाची गोष्ट 2' या नवीन चित्रपटात झळकणार आहे.
'प्रेमाची गोष्ट 2' चित्रपटाचे 'ओल्या सांजवेळी 2.0' हे गाणं रिलीज झाले आहे.
'प्रेमाची गोष्ट 2' चित्रपट 22 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
मराठी अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) सध्या त्याच्या 'आरपार' चित्रपटामुळे चांगला चर्चेत आहे. 'आरपार'मध्ये ललित आणि ऋता दुर्गुळे ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 'आरपार'ला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. आता 'आरपार'च्या यशानंतर ललित प्रभाकर एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट देखील एक सुंदर लव्ह स्टोरी आहे.
सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांची आवडती आहेत. या चित्रपटातील 'ओल्या साजं वेळी' हे गाणं अत्यंत लोकप्रिय झाले. या गाण्यात प्रेमाची वेगळीच जादू आहे. संगीतप्रेमींच्या ओठांवर हे गाणे कायम पाहायला मिळते. आजही या गाण्याची जादू जोडप्यांवर पाहायला मिळते. आता लवकरच 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटाचा सीक्वल 'प्रेमाची गोष्ट 2' (Premachi Goshta 2) येणार आहे.
'प्रेमाची गोष्ट 2'मधील एक रोमँटिक गाणं रिलीज झाले आहे. 'ओल्या साजं वेळी' (Olya Sanjveli 2.0) गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'प्रेमाची गोष्ट 2'मध्ये मराठी अभिनेता ललित प्रभाकर झळकणार आहे. ऋता दुर्गुळेनंतर रुचा वैद्यसोबत रोमँटिक अंदाजात ललित पाहायला मिळणार आहे. रुचा आणि ललितच्या मनमोहक केमिस्ट्री जादू प्रेक्षकांना वेड लावणार आहे.
'ओल्या साजंवेळी' या गाण्याला काविर आणि बेला शेंडे यांचे सुरेल स्वर लाभले आहेत. 'प्रेमाची गोष्ट 2'या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. निर्माते संजय छाब्रिया तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. 'ओल्या साजंवेळी' चित्रपटात ललित प्रभाकर आणि रुचा वैद्यसोबत भाऊ कदम, स्वप्नील जोशी, रिधिमा पंडित हे कलाकार झळकले आहेत. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास 22 ऑक्टोबरपासून अनुभवायला मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.