Tanya Mittal Amaal Mallik: अमल मलिक आणि तान्या मित्तलच्या नात्याला सुरुवात; बिग बॉसमध्ये खुलणार नवी प्रेमकथा

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' या रिअॅलिटी शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये तान्या मित्तल आणि अमल मलिक दिसत आहेत. यावेळी तान्या अमलची काळजी घेताना दिसत असून त्यांच्या नविन नात्याची सूरुवात झाल्याचे नेटकरी बोलतं आहेत.
Tanya Mittal Amaal Mallik
Tanya Mittal Amaal MallikSaam Tv
Published On

Tanya Mittal Amaal Mallik: सलमान खानच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' चा नवीन प्रोमो समोर आला आहे आणि यावेळी त्याची झलक प्रेक्षकांना फार आवडली आहे. नवीन प्रोमोमध्ये तान्या मित्तल आणि अमल मलिक यांच्यातील हृदयस्पर्शी संवाद दाखवण्यात आला आहे, यामुळे शोमधील तणावपूर्ण वातावरण काही काळासाठी मंदावले. मागील भागात तान्या अमलचा चष्मा दाखवताना दिसली होती, आता येणाऱ्या भागात ती अमलला आधार देताना दिसली.

प्रोमोची सुरुवात

व्हिडिओच्या सुरुवातीला, अमल मलिक खूप दुःखी आणि रडताना दिसत आहे.तान्या त्याच्याकडे जाते, त्याचा हात धरते आणि तिच्या हातांनी त्याचे अश्रू पुसते. यानंतर ती त्याला एक गोष्ट सांगते. गोष्ट, ऐकून अमल हसून विचारतो "ही माझी गोष्ट तर नाही?"

Tanya Mittal Amaal Mallik
Karishma Sharma: धावत्या लोकलमधून उडी मारणारी अभिनेत्री कोण? का उचलले असं पाऊल, वाचा सविस्तर

प्रोमोवर लोकांच्या प्रतिक्रिया

काही चाहत्यांना हा व्हिडिओ प्रेक्षकांना फारच आवडत आहे. अनेक नेटकरी कमेंट करत कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले, या दोघांची जोडी खूप सुंदर आहे. तर एका नेटकऱ्याने लिहीले, तान्या फेम मिळवण्यासाठी अमालचा वापर करत आहे. आता या दोघांची मैत्री आणि की प्रेमाची सुरुवात होऊ लागली आहे हे पुढील भागात कळेल.

Tanya Mittal Amaal Mallik
Kapil Sharma Warning:कपिल शर्माला मनसेचा गंभीर इशारा, मुंबईचा अपमान केल्याचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण

गावकरी त्याला खूप त्रास द्यायचे

तान्या मित्तल गोष्ट सांगताना म्हणाली, 'एक गाव होतं. तिथे मुलगा राहायचा. पण गावकरी त्याला खूप त्रास द्यायचे.' तान्या असे म्हणते तेव्हा व्हिडिओमध्ये अमल मलिक आणि कुनिका सदानंद यांच्यात वाद दिसून येतो. हळूहळू तान्या अमालला शांत करते आणि धीर देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com