Arijit Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arijit Singh : अरिजीत सिंगची नवी इनिंग! अवघ्या ४० रुपयांत देणार स्वादिष्ट जेवण

Arijit Singh Opens Restaurant : गायक अरिजीत सिंगने स्वतःचे नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. त्याच्या या रेस्टॉरंटमध्ये फक्त ४० रुपयांत जेवण मिळणार आहे.

Shreya Maskar

आपल्या आवाजाने जगाला वेड लावणारा गायक अरिजित सिंग (Arijit Singh) कायम त्याच्या दमदार गाण्यांमुळे चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्याच्या कॉन्सर्टला कायम गर्दी पाहायला मिळते. आता मात्र गायक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अरिजित सिंग आता बिझनेस मॅन झाला आहे. त्याने स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला आहे.

अरिजीत सिंगने नुकतेच स्वतःचे एक नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. या रेस्टॉरंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरिजीत सिंगने सुरू केलेल्या रेस्टॉरंटचे एक खास वैशिष्ट्य आहे. अरिजीत सिंगने हे रेस्टॉरंट सामान्य लोकांसाठी सुरू केले आहे. अरिजीत सिंगच्या या नवीन रेस्टॉरंटचे नाव 'हेशेल' (Heshel ) असे आहे.

अरिजीत सिंगने हे रेस्टॉरंट पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील जियागंज येथे सुरू केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरिजीत सिंगच्या रेस्टॉरंटमध्ये सर्वसामान्यांना फक्त 40 रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. अरिजीत सिंगच्या रेस्टॉरंटमध्ये सर्वसामान्यांनासाठी एका थाळीची किंमत अवघी 40 रुपये असणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'हेशेल' या शब्दाचा अर्थ बंगालीमध्ये स्वयंपाकघर असा अर्थ होतो. सर्वसामान्यांना कमी पैशांत घरचे जेवण देण्यासाठी अरिजीत सिंगने हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. मात्र अद्याप यावर अरिजीत सिंगने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. असे बोले जाते की, अरिजीत सिंगचे हे नवीन रेस्टॉरंट त्याचे वडील चालवतात.

सध्या सर्वत्र अरिजीत सिंगचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अरिजीत सिंगची 'आशिकी 2' ची गाणी खूप प्रसिद्ध झाली. चाहते आता त्याच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT