Dhanshri Shintre
अरिजीत सिंगचा भावूक आवाज इतका जादूई आहे की तो ऐकणाऱ्याच्या मनावर थेट परिणाम करतो.
अरिजीत सिंगचा प्रत्येक परफॉर्मन्स चाहत्यांच्या मनात घर करून जातो आणि त्यांना पूर्णपणे भारावून टाकतो.
मजेदार, रोमँटिक किंवा दुःखी अरिजीत सिंगने प्रत्येक भावनेला स्पर्श करणारी गाणी गायली आणि ती सर्व सुपरहिट ठरली.
२५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्मलेले अरिजीत सिंग आज आपल्या ३८ व्या वाढदिवसाचे औचित्य साजरे करत आहेत.
‘तमाशा’ चित्रपट अपयशी ठरला, पण ‘अगर तुम साथ हो’ हे अरिजीत आणि अलकाचे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं.
‘ऐ दिल है मुश्किल’मधील रणबीरवर चित्रित ‘चन्ना मेरेया’ हे गाणं अरिजीत सिंगच्या भावुक शैलीत सुपरहिट ठरलं.
‘एक विलेन’मधील सिद्धार्थ-श्रद्धावर चित्रित ‘हमदर्द’ हे अरिजीत सिंगचं गाणं आजही चाहत्यांच्या हृदयात जपलं जातं.
‘ये जवानी है दिवानी’मधील रणबीर आणि दीपिकावर चित्रित ‘कबीरा’ हे अरिजीत सिंगचं भावस्पर्शी गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात ताजं आहे.
‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपटातील टायटल ट्रॅक अरिजीत सिंगने गायले आहे, जो इमरान हाश्मी आणि विद्या बालनवर चित्रित केलेलं एक सुंदर दुःखी गाणं आहे.