adarsh shinde  Saam tv
मनोरंजन बातम्या

Adarsh Shinde : 'दादा सॉरी'; आदर्श शिंदेनी भर कार्यक्रमात मागितली अजित पवारांची माफी; नेमकं काय घडलं?

Singer Adarsh Shinde Apologizes to Ajit Pawar : प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेनी भर कार्यक्रमात अजित पवारांची माफी मागितली. आदर्श शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संवाद व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

गायक आदर्श शिंदे भर संगीताच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे स्वागत करत होता. आधी छगन भुजबळांचं स्वागत केलं. त्यांच्या बाजूला समीर भुजबळ बसले होते. त्यांचे स्वागत करून माजी मंत्री नवाब मलिक यांचं स्वागत केलं. यावेळी नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार बाजूला बसल्याचे सांगितले. त्यानंतर दादा सॉरी, तुम्हाला पाहिलंच नाही, असं आदर्श शिंदेने म्हणत अजित पवारांचंही स्वागत केलं. खेळीमेळीच्या वातावरणात हा सुसंवाद सुरु होता. आदर्श शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कलाकार आणि राजकीय नेत्यांचा कार्यक्रमानिमित्त गाठीभेटी होत राहतात. अनेक राजकीय नेते कलाकारांना प्लॅटफॉर्म देत असतात. मनोरंजनाचा कार्यक्रम म्हटलं तर कलाकार राजकीय नेत्यांशी मनमोकळेपणांने गप्पा मारत असतात. राजकीय नेते आणि कलाकार दोघेही एकमेकांशी सलोख्याचे संबंध ठेवून असतात. असाच एक कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आला होता. मुंबईच्या बांद्रा येथे राष्ट्रवादीकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव २०२५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील गायक आदर्श शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्याचा संवाद सध्या चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव २०२५ मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदर्श शिंदेला गायनासाठी बोलावलं होतं. या कार्यक्रमात आदर्श शिंदे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत करत होता. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचे स्वागत करत असताना आदर्श शिंदे अजित पवारांचं नाव घेणे राहून गेलं. नवाब मलिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील कार्यक्रमाला आल्याचे सांगितल्यानंतर आदर्श शिंदेने भरकार्यक्रमात सॉरी बोलत माफी मागितली.

आदर्श शिंदे नेमकं काय म्हणाला?

'वंदामी भंते. सर्व मंडळी बघून आनंद झाला. छगन भुजबळ सर, आमचे मोठे बंधू समीर भुजबळ, सिद्धार्थ कांबळे. सर्वात आधी सिद्धार्थ कांबळे यांच्या टीमसाठी टाळ्या वाजवुयात. त्यांची टीमने गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मेहनत घेतली. नवाब मलिक देखील आले आहेत. त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवुयात. अरे व्वा...दादा पण आले आहेत. अजितदादांना मी पाहिलंच नाही. मी आतमध्ये होतो. मला कळलंच नाही की, सर्व जण आले आहेत, असं आदर्श शिंदे म्हणाला. खेळीमेळीत हा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; तब्बल ८२ मिनिटं दिसणार Blood Moon, जाणून घ्या सुतक काळ

Maharashtra Live News Update: पुण्यातील शनिपार मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी साकारला ३५ फूट "देवमासा"

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

SCROLL FOR NEXT