salman khan sikandar movie teaser postponde due to Former Prime Minister Manmohan Singh Passes Away Google
मनोरंजन बातम्या

Sikandar Teaser Postponed : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सलमानच्या 'सिकंदर' टीझर रिलीजची तारीख बदलली

Sikandar Movie Teaser Postponed : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sikandar Teaser Postponed : सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या बहुप्रतिक्षित 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर आज (२७ डिसेंबर) सलमान खानच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार होता. तथापि, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे त्यांनी टीझर प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे उघड केले आहे. आता हा टीझर उद्या, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११:०७ वाजता प्रदर्शित होईल.

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर ही माहिती पोस्ट करण्यात आली आहे. त्यात लिहिले होते, “आपले आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जी यांचे निधन झाल्यामुळे आम्हाला आज प्रदर्शित होणार सिकंदर या आगामी चित्रपटाचा टीझर उद्या २८ डिसेंबर सकाळी ११ च्या नंतर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या शोकाच्या काळात आपण एकत्र असणे गरजेचे आहे.आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. – #TeamSikandar.” सिकंदरचा टीझर प्रदर्शित होण्याच्या काही तास आधी ही घोषणा करण्यात आली.

दरम्यान, सलमान खानच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, निर्मात्यांनी 'सिकंदर' या चित्रपटातील सलमानच्या पहिल्या लूकचे अनावरण केले. पोस्टरमध्ये सलमान एका खास पोजमध्ये हातात धारदार भाल्यासारखे शस्त्र दिसतो घेऊन उभा आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित, 'सिकंदर' या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

'सिकंदर' या चित्रपटात सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांच्यासारखे अनेक उत्तम कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आहे. साजिद नाडियाडवाला एका नवीन जोडीच्या शोधात होते आणि रश्मिका या पटकथेसाठी योग्य होती. सलमान खानचा हा चित्रपट २०२५ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Garlic Paste: आलं-लसूण पेस्ट लवकर खराब होते? मग वापरा 'या' सोप्या टिप्स अन् महिनाभरासाठी साठवा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिला अपात्र, ६८०० कोटींची सरकार वसुली होणार?

कोणतेही पुरावे सापडले नाही...; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर कोर्टाची निरीक्षणे काय? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; प्रा.शिवाजीराव सावंतांनी दिला राजीनामा

Sambhajinagar : बनावट विद्यार्थी दाखवून लाटले साडेसहा कोटी रुपये; चार महाविद्यालयांकडून करण्यात आली फसवणूक

SCROLL FOR NEXT