Sikandar Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sikandar Box Office Collection : 'सिकंदर' लवकरच पार करणार १०० कोटींचा टप्पा, चौथ्या दिवशी किती कमावले?

Sikandar Box Office Collection Day 4 : सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट आता लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. या चित्रपटातून सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांची जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shreya Maskar

सलमान खान सध्या त्याच्या 'सिकंदर' (Sikandar ) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'सिकंदर' 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाची ईदच्या दिवशी भरपूर कमाई झाली होती. मात्र त्यानंतर कलेक्शनच्या आकड्यात घसरण पाहायला मिळत आहे. चित्रपटाला रिलीज होऊन आता चार दिवस पूर्ण झाले आहेत. 'सिकंदर' चित्रपटाचे चौथ्या दिवशी (Sikandar Box Office Collection Day 4) किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

'सिकंदर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दोन दिवशी बंपर कमाई केली. मात्र त्यानंतर 'सिकंदर'च्या कलेक्शनमध्ये सतत घसरण होताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई तर दुसऱ्या दिवशी 29 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी फक्त 19.5 कोटींची कमाई असून चौथ्या दिवशीच्या आकड्यात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, भाईजानच्या 'सिकंदर' चित्रपटाने चौथ्या दिवशी 9.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चार दिवसात हा चित्रपट 84.25 कोटींवर पोहोचला आहे. आता चित्रपटाची 100 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अद्याप 'सिकंदर'ने चित्रपटाचे बजेट वसूल केले नाही आहे. मात्र सलमान खानने सांगितल्यानुसार चित्रपट नक्कीच 100-200 कोटींचा टप्पा पार करेल. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे.

'सिकंदर' स्टारकास्ट

'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) झळकली आहे. तसेच चित्रपटात काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आणि सत्यराज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चित्रपटातील सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT