Sikandar Box Office Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sikandar Box Office Collection : तिसऱ्या दिवशी 'सिकंदर'ची बॉक्स ऑफिसवर घसरण, आतापर्यंतच्या कमाईचा आकडा किती?

Sikandar Box Office Collection Day 3 : सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कोटी कमावले जाणून घेऊयात. तिसऱ्या दिवशी कलेक्शनच्या आकड्यात घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा 'सिकंदर' (Sikandar) चित्रपट गाजत आहे. या चित्रपटाले पहिले दोन दिवस उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता तिसऱ्या दिवशी 'सिकंदर'ची कामगिरी चिंताजनक आहे. कलेक्शनच्या आकड्यात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

'सिकंदर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट रिलीज होऊन आता तीन दिवस पूर्ण झाले आहेत. दोन दिवस चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. मात्र तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या आकड्यांमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली आहे. तर 'सिकंदर'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी 29 कोटींचा व्यवसाय केला आहे.

'सिकंदर'चे तिसऱ्या दिवशीच्या कलेक्शनचे आकडे निराशाजनक आहेत. 'सिकंदर' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी फक्त 19.5 कोटींची कमाई केली आहे. 'सिकंदर'ने आतापर्यंत 74.5 कोटी रूपये कमावले आहे. आता भाईजानच्या 'सिकंदर' चित्रपटाची 100 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अद्याप 'सिकंदर'ने चित्रपटाचे बजेट वसूल केले नाही आहे. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे.

'सिकंदर' स्टारकास्ट

'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ( Rashmika Mandanna ) पाहायला मिळत आहे. या चित्रपटात यांच्यासोबत काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'बाहुबली' फेम अभिनेते सत्यराज 'सिकंदर' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे. चित्रपटातील सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Yoga Exercise: फिट राहण्यासाठी सकाळी करा फक्त ही 5 योगा

Konkan Kanya Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! आता सीट पक्कीच समजा; ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे

Nashik News: नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात ACB ची मोठी कारवाई, महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT