SIDHARTH MALHOTRA FATHER DEATH: ACTOR LOSES HIS FATHER SUNIL MALHOTRA saam tv
मनोरंजन बातम्या

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Sidharth Malhotra Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दिल्लीत केले जाणार आहेत.

Bharat Jadhav

बॉलिवूडमधून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे दिल्लीत निधन झाले. ही घटना १४ फेब्रुवारीच्या दिवशी घडली असून चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळल्यानतंर अभिनेता सिद्धार्थ त्यांच्या पत्नी कियारा अडवाणीसह अंत्यसंस्कारासाठी दिल्लीला रवाना झाला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सुनील मल्होत्रा ​​काही काळापासून आजारी होते. ते मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि काही काळापासून त्यांना अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे ते व्हीलचेअरवर बसून होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या वडिलांच्या खूप जवळचा होता आणि त्यांच्या निधनाने तो दुःखी झालाय.

दरम्यान गेल्या वर्षी एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की तो कामासाठी मुंबईत राहतो, त्यामुळे त्याला त्याची आई त्याच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी दिल्लीत राहते याचा पश्चात्ताप आहे. त्याने सांगितले की त्याच्या आईने वडिलांच्या स्थितीबद्दल अनेक गोष्टी त्याच्यापासून लपवल्या होत्या. पण त्याला त्याच्या आईचा त्याग पूर्णपणे समजला नसल्याचंही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT