Siddharth Malhotra And Kiara Adwani Latest News Update  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Siddharth- Kiara Wedding: बँड-बाजा, वरात-घोडा, घेउनी आले नवरोजी; कियारा-सिद्धार्थने सूर्यगढ पॅलेसमध्ये घेतली सप्तपदी

बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल जोडपं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर आज लग्नबंधनात अडकले.

Chetan Bodke

Siddharth- Kiara Wedding: बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल जोडपं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर आज लग्नबंधनात अडकले. या दोघांनीही राजस्थानच्या जैसलमेरमधील सुर्यगड पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या ही लग्नाची चर्चा सुरु होती. एएनआयने ट्वीट करत याबाबत अधिकृत माहिती चाहत्यांना दिली आहे.

लग्नाचे कोणतेही फोटो बाहेर जाणार नाहीत किंवा ते सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी सिद्धार्थ आणि कियारानं गेल्या अनेक दिवसांपासून घेतली आहे. सकाळपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना अखेर ही गुड न्यूज मिळाली आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​लग्नबंधनात अडकले आहेत. या अविस्मरणीय क्षणासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनी राजस्थानमधील जैसलमेरची निवड केली होती.

कियारा आणि सिद्धार्थ 7 फेब्रुवारीला संध्याकाळी जैसलमेरची शान असलेल्या सूर्यगढ हॉटेलमध्ये एकमेकांना सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले. लग्नासाठी या स्टार्सनी सूर्यगढ पॅलेसच्या 80 रूम्स बुक केल्या होत्या. डेस्टिनेशन वेडिंगसाठी या पॅलेसचे भाडे 1 कोटी 20 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एका खोलीचे भाडे दोन लाख रुपयांपर्यंत आहे. रॉयल रूमबद्दल बोलायचे झाले तर त्याचे भाडे एक कोटी रुपयांपर्यंत आहे.

या राजवाड्यात नील नावाचा एक सुंदर जलतरण तलाव देखील आहे, जो संथ प्रकाशात तलावाचे निळे पाणी प्रकाशित करतो आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना रॉयल बाथचा फील देतो. सूर्यगढचा राजशाही डायनिंग हॉल प्राचीन कटलरी आणि फर्निचरने सजलेला आहे. पॅलेसची जीमही अनोखी आहे. त्याचे नाव आखाडा असून आधुनिक यंत्रसामग्रीसह देशी मुगदारही येथे उपलब्ध आहे. लेक गार्डन्स येथे राहणाऱ्यांसाठी संध्याकाळ अधिक रोमांचक बनवते. येथे लोक त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांसह सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आसनगाव येथील एस के आय कंपनीला भीषण आग

Diwali Lucky Zodiac Sign: या लोकांसाठी दिवाळी ठरणार शुभ; या राशींवर पडणार पैशांचा पाऊस, शनीचा होणार फायदा

Bigg Boss 19: रात्री कपडे बदलणार होती तेवढ्यात...; अभिषेकच्या 'या' वागण्यामुळे अशनूर संतापली

Dharmapuri Fort History: धर्मापूरी किल्ला माहितेय का? जाणून घ्या ऐतिहासिक वारसा आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये

मोठी बातमी! खासदार संजय राऊत फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल

SCROLL FOR NEXT