Siddhaanth Vir Surryavanshi/Social Media SAAM TV
मनोरंजन बातम्या

Siddhaanth Vir Surryavanshi : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांतचं जीममध्ये वर्कआऊट करताना निधन

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि सर्वात लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं निधन झालं आहे.

Nandkumar Joshi

Siddhaanth Vir Surryavanshi : टीव्ही इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि सर्वात लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं निधन झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जीममध्ये वर्कआउट करताना सिद्धांतचं निधन झालं. अलीकडेच आनंद सूर्यवंशी हे नाव बदलून सिद्धांत सूर्यवंशी केलं होतं. सिद्धांतच्या निधनानं टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार आणि प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वातील (TV Actor) प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याने ४६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्धांतला शुक्रवारी सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतरही तो जीममध्ये गेला होता. जीममध्ये वर्कआउट करताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. सिद्धांत याला त्याचा ट्रेनर रुग्णालयात तातडीने घेऊन गेला. तिथे त्याला मृत घोषित केले.

डॉक्टरांनी सिद्धांतला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. राजू श्रीवास्तव, दीपेश भान यांच्यानंतर जीममध्ये वर्कआउट करताना सिद्धांतचा मृत्यू झाला आहे. सिद्धांत हा कुसूम, वारिस आणि सूर्यपुत्र करण या मालिकांमधून (TV Serial) घराघरांत पोहोचला होता. अभिनेता आणि निवेदक जय भानुशाली यानं चाहत्यांना ही दुःखद माहिती दिली आहे. सिद्धांत वीरच्या पश्चात पत्नी अलीसिया राऊत आणि दोन मुले आहेत. फिटनेसबाबत सिद्धांत प्रचंड सतर्क असायचा, असं त्याचे निकटवर्तीय सांगतात.

जय भानुशाली याने सिद्धांत वीरचे फोटो शेअर करत हे दुःखद वृत्त दिले आहे. भाई, तू खूप लवकर सोडून गेलास, असं त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. माध्यमांशी बोलतानाही जय भानुशाली हा भावुक झाला होता. त्यानं सिद्धांतच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जीममध्ये वर्कआउट करतानाच त्याचं निधन झालं, असंही त्याने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

SCROLL FOR NEXT