VIDEO: सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिलनं गायलं 'हे' गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक

नुकताच शहनाजने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर 'ले डूबा' हे गाण शेअर केले आहेत
Shehnaaz Gill
Shehnaaz Gill Saam Tv

मुंबई : 'बिग बॉस' फेम शहनाज गिल(Shehnaaz Gill) टिव्ही इंडस्ट्रीतून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान'(kisi ka bhai kisi jaan) या चित्रपटातून शहनाज बॉलिवूड डेब्यू करते आहे. शहनाजला रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. शहनाज गिल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या अतरंगीपणामुळे नेहमी चर्चेत असते. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी शहनाज सध्या तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आहे. अभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते. आता देखील शहनाजने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Shehnaaz Gill
Sai Tamhankar: मराठी सिनेसृष्टीतील बिकीनी गर्लचा 'बस बाई बस' या कार्यक्रमात जलवा

नुकताच शहनाजने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर 'ले डूबा' हे गाण शेअर केले आहेत. शहनाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर तिच्या काही चाहत्यांना तिच्या गाण्यावरून सिद्धार्थ शुक्लाची आठवण येत आहे.

Shehnaaz Gill
Koffee With Karan Season 8 | 'कॉफी विथ करण'चा सीझन 8 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; बॉलिवूडमधील अनेक सिक्रेट्स उलगडणार

शहनाजने गायलेले 'ले डूबा' हे गाणं रकुल प्रीत सिंह आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या 'अय्यारी' चित्रपटातील आहे. जे एक रोमँटिक गाणं आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत असताना शहनाज गिल गात असते. शहनाज जेव्हा जेव्हा असे व्हिडिओ शेअर करते तेव्हा चाहते सिद्धार्थ शुक्लाच्या तिच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देतात होतात. अर्थातच, सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर 'सिडनाझ' ही जोडी तुटली, परंतु चाहते आजही या सुंदर कपलला विसरलेले नाहीत.

शहनाज गिल सध्या बॉलिवूड डेब्यू 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच सेटवरील तिचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. यामुळेच चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान, शहनाज गिलसह पूजा हेगडे, पलक तिवारी असे कलाकार दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com