shyam benegal Saam tv
मनोरंजन बातम्या

Shyam Benegal Death : कलाकार घडवणारा 'गुरू' हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन

Shyam Benegal News :बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झालं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी बेनेगल यांनी अखेरचा श्वास घेतला. बेनेगल यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : अंकुर, निशांत, जुबैदा, मंथन आणि भूमिका यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणारे, भारतीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना घडवणारे 'गुरू' अशी ओळख असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्याम बेनेगल यांचे सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईतील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये निधन झालं. बेनेगल यांच्या कन्या पिया बेनेगल यांनी इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया देताना या वृत्ताला दुजोरा दिला. अंकुर, निशांत, मंथन, भूमिका, जुबैदा, सरदारी बेगम यांसारख्या हिट चित्रपटांच्या माध्यमातून श्याम बेनेगल यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं.

श्याम बेनेगल यांनी १९७६ मध्ये पद्मश्री आणि १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. श्याम बेनेगल यांच्या सिनेमांतून भारतीय सिनेसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार मिळाले. त्यात अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील अशी प्रमुख नावं आहेत.

श्याम बेनेगल यांची मुलगी पिया यांनी सांगितलं की, ' ते क्रोनिक किडनी आजाराने ग्रस्त होते. या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात होते. श्याम बेनेगल यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अंत्यसंस्काराचा काही वेळेनंतर निर्णय घेण्यात येईल. श्याम बेनेगल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत. त्यांचं घरातच डायलिसिस सुरु आहे'.

8 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले

श्याम बेनेगल यांच्या सिनेमांनी आतापर्यंत ८ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्यांनी जुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा,नेताजी चंद्र बोस : द फॉरगोटन हिरो, मंडी, आरोहन, वेलकम टु सज्जनपूर सारख्या डझनभर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यातील काही सिनेमांना ८ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. श्याम बेनेगल यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार देखील मिळाला आहे.

श्याम बेनेगल यांनी त्यांच्या करिअरमध्ये २४ सिनेमे, ४५ डॉक्यूमेंट्री आणि १५०० जाहिराती केल्या आहेत. त्यांना १९७६ साली पद्मश्री पुरस्कारानेही देखील सन्मानित करण्यात आलं आहे. १९९१ साली श्याम यांना पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्याआधी श्याम बेनेगल यांनी अनेक केम केलंय. त्यांनी अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास केला आहे. त्यांनंतर त्यांनी फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली होती. १२ वर्षांचे असताना त्यांनी त्यांचे पिता श्रीधर बी. बेनेगल यांच्यासाठी कॅमेऱ्याच्या साहाय्याने पहिला सिनेमा तयार केला होता.

अविस्मरणीय देणगी असलेल्या 'भारत एक खोज' या पुस्तकावरील आधारीत ५३ भागांचे एकूण ऐतिहासिक नाटक आहे. या नाटकासाठी श्याम बेनेगल यांनी सरकारी मालकीच्या दूरदर्शनसाठी सिनेमॅटोग्राफर व्हीके मूर्ती यांच्यासोबत नाटकाचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT