Sanket Pathak- Suparna Shyam Wedding: संकेत- सुपर्णाच्या लग्नात लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी; निवेदिता सराफ यांचा खास आशिर्वाद

लग्नाची बेडी मालिकेत मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता संकेत पाठक नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
Sanket Pathak- Suparna Shyam Wedding
Sanket Pathak- Suparna Shyam WeddingSaam Tv
Published On

Sanket Pathak- Suparna Shyam Wedding: लग्नाची बेडी मालिकेत मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता संकेत पाठक नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड सुपर्णा श्याम सोबत लगीनगाठ बांधली आहे. यावेळी अनेक मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली असून संकेत- सुपर्णाच्या विवाहसोहळ्याला चारचाँद लावले. मुख्य बाब म्हणजे यावेळी निवेदिता सराफ यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांनी नवविवाहित दाम्पत्याला आशिर्वाद देत शुभेच्छा दिल्या. (Entertainment News)

Sanket Pathak- Suparna Shyam Wedding
Manoj Bajpayee's Bandaa Poster: मनोज वायपेयींच्या जन्मदिनी त्याच्या नव्या चियत्रपटची घोषणा; सत्य घटनेवर आधारित 'बंदा'ची घोषणा

निवेदिता यांनी संकेत आणि सुपर्णा यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करून निवेदिता सराफ म्हणतात, माझा प्रिय संकेत पाठक आणि सुपर्णा श्यामचे लग्न झाले. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. खूप आणि खूप आशीर्वाद.. अशा आशयाची पोस्ट लिहित निवेदिता सराफ यांनी संकेत आणि सुपर्णाला आशीर्वाद दिले. (Latest News)

सराफ कुटुंबीयांचे आणि संकेत- सुपर्णा यांच्यातील नाते फार जवळचे आहेत. अशोक सराफ यांचा जेव्हा ७५ वा वाढदिवस जेव्हा झाला त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी संकेत- सुपर्णा हे दोघे सुद्धा गेले होते. यांच्यात घरेलू संबंध असल्यामुळे नेहमीच ते एकमेकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. काही कारणास्तव अशोक सराफ लग्नाला उपस्थित होते. (Marathi Actors)

सुपर्णा- संकेत हे दोघेही टेलिव्हिजन स्टार्स असून त्यांच्या लग्नात निवेदिता सराफ यांनी नवदाम्पत्यासोबत ठेका धरला. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असून सध्या त्यांच्या लग्नाची जोरात चर्चा सुरू आहे. (Marathi Film)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com