Shruthi Narayanan New Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shruthi Narayanan: 14 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक; काही तासांनीच अभिनेत्रीनं शेअर केले फोटो, पण...

Shruthi Narayanan New Photos: तमिळ अभिनेत्री श्रुति नारायणनचा १४ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यातच श्रुतिने नविन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत हे काम केले आहे.

Shruti Vilas Kadam

Shruthi Narayanan New Photos: तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणनचा एक व्हिडिओ लिक झाला आहे. ही १४ मिनिटांची क्लिप रेडिटवर वेगाने व्हायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की ती एका खाजगी ऑडिशन दरम्यान रेकॉर्ड करण्यात आलेला व्हिडीओ आहे. ही क्लिप कथितपणे तमिळ चित्रपट उद्योगातील कास्टिंग काउचचे भयानक वास्तव्य असल्याचे बोलले जाते. हा व्हिडिओ एक्स, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात होता आणि कालपासून हजारो वेळा पाहिला गेला आहे. या सर्वांमध्ये, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच नविन फोटो पोस्ट करत कमेंट सेक्शन बंद केले आहे.

श्रुतीने एआय-जनरेटेड कंटेंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे

श्रुतीचा हा क्लिप एआय-जनरेटेडबद्दल आहे. व्हिडीओमध्ये तमिळ चित्रपट उद्योगातील गैरवापराबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. व्हिडिओ खरा आहे की खोटा कसे ओळखता येईल या संदर्भात हा व्हिडीओ आहे. तिचा लिक व्हिडिओ खरा आहे की खोटा याची पुष्टी झालेली नसली तरी, अनेक प्रेक्षकांचे असे मत व्यक्त केले आहे की तो डीपफेक असू शकतो. सुमारे ४२,००० फॉलोअर्स असलेल्या या अभिनेत्रीने यापूर्वी तिचे इंस्टाग्राम अकाउंट खाजगी केले होते. श्रुतीने नुकतेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले आहे.

श्रुती नारायणन कोण आहे?

श्रुती नारायणन ही चेन्नईची २४ वर्षीय अभिनेत्री आहे, जी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी 'सिरागदिक्का आसाई' सारख्या तमिळ टीव्ही शोमुळे लोकप्रिय झाली होती. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे, तिचे इंस्टाग्रामवर ४२० हजार फॉलोअर्स आहेत. ती शेवटची सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन स्टारर 'सिटाडेल: हनी बनी' या चित्रपटात दिसली होती.

व्हिडिओशी संबंधित कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी फुटेजमध्ये दाखवलेल्या शोषणावर टीका करत संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हिडिओच्या वैधतेबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. तसेच, २७ मार्च २०२५ पर्यंत पोलिस किंवा उद्योग संघटनांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. शिवाय, श्रुती नारायणनच्या प्रकरणाची तुलना त्रिशा कृष्णन आणि अमला पॉल सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींशी संबंधित मागील घटनांशी केली गेली आहे, ज्या नंतर बनावट असल्याचे सिद्ध झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT