Shreya Maskar
मिष्टी दोई ही प्रसिद्ध बंगाली गोड डिश आहे.
मिष्टी दोई बनवण्यासाठी दूध, साखर, दही आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
मिष्टी दोई बनवण्यासाठी पातेल्यात दूध उकळवून छान आटून घ्या.
दूध थोडे थंड झाल्यावर त्यात साखर, वेलची पूड टाका.
पुढे या मिश्रणात दही घालून मिक्स करा.
मिश्रण एका भांड्यात ओतून झाकण लावून ठेवा.
मिश्रण सेट होण्यासाठी 15-20 तास लागतात.
तुम्ही यात आवडीनुसार पिस्ता आणि केशर घालून सजवा.