Shreya Maskar
घरीच सिंपल पद्धतीने पाणीपुरीची पुरी बनवा.
पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी रवा, मैदा, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या ताटात रवा, मैदा, मीठ मिक्स करा.
त्यानंतर पिठात हळूहळू पाणी टाकून कणिक मळून घ्या.
तयार पीठ 15-20 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
पिठाचे छोटे गोळे करून त्याची पुरी लाटून घ्या.
खरपूस तेलात पाणी पुरीच्या पुऱ्या तळून घ्या.
तयार पुऱ्यांमध्ये रगडा आणि पाणी टाकून पाणीपुरीचा आस्वाद घ्या.