Shreyas Talpade Told Story of Pushpa Famous Dialogue Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade In Khupte Tithe Gupte : 'तू पनवती आहेस', काम नव्हतं तेव्हा श्रेयस तळपदेला कॅमेरामॅनने सुनावलं, खुपते तिथे गुप्तेमध्ये केल्या शेअर भावना

Shreyas Talpade Spoke About His Experience : प्रोमोमध्ये श्रेयस हा त्याच्या काही आठवणी शेअर करताना दिसत आहे.

Pooja Dange

Shreyas Talpade Share His Bad Experience : गायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्ते त्याचा 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या कार्यक्रमच दुसरा आणखी दमदार होणार यात शंकाच नाही.

'खुपते तिथे गुप्ते'च्या दुसरा पर्वाचा पहिला भाग काल प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. आता पुढच्या भागात अभिनेता श्रेयस तळपदे येणार आहे. मराठीतील सुपरस्टार, पुष्पाचा आवाज अशी ओळख असणारा श्रेयस आता खुपते तिथे गुप्ते शोमध्ये कोणत्या खुपणाऱ्या गोष्टींचा उलघडा हे पाहण्यासारखं आहे. (Latest Entertainment News)

खुपते तिथे गुप्तेच्या पहिल्या भागात राज ठाकरे आले होते. अवधूत आणि राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.आता पुढच्या भागात श्रेयस तळपदे येणार आहे. कार्यक्रमाच्या या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये श्रेयस हा त्याच्या काही आठवणी शेअर करताना दिसत आहे.

श्रेयसने सांगितला वाईट अनुभव

श्रेयस हा मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयसने पुन्हा टीव्ही मालिकेत पदार्पण केले होते. ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. रोहित शेट्टींच्या तालमीत तयार झालेला श्रेयस हा गोलमोल चित्रपटाच्या सीरीजमध्ये दिसला होता. श्रेयसने पुष्पा चित्रपटासाठी हिंदीमध्ये डबिंग केली आहे. त्यासाठी आजही त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत.

खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात श्रेयसने त्याच्या आयुष्यातील वाईट अनुभव शेअर केल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. श्रेयस एकदा एका मालिकेच्या ऑडिशनला गेला होता. तेव्हा तो ऑडिशनला सुरुवात करणार इतक्यात त्याला थांबविण्यात आले.

काहीतरी कारणांनी ऑडिशन थांबवण्यात आलं होत. त्याने अर्धा तास वाट पाहिली पण त्याला काही रिसपॉन्सच मिळाला नाही. त्याने पुन्हा सुरवात केली तेव्हाही काहीतरी तांत्रिक अडचण आल्याचे सांगण्यात आले.

त्यावर तेथील कॅमेरामन त्याला म्हणाला की, "तू पनवती है यार." यावर श्रेयस म्हणाला "हा! हू यार अब क्या करु". 'काय करु कामचं नव्हत तेव्हा' असं म्हणत श्रेयसने त्याच्या करियरमधील एक वाईट अनुभव शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT