Shreyas Talpade-Radhika Kumaraswamy’s New Kannada Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade-Radhika Kumaraswamy’s Film: श्रेयसला लागली लॉटरी, आता थेट ‘द केरला स्टोरी’तील अभिनेत्रीसोबत करणार सिनेमा

श्रेयसने त्याच्या टॉलिवूडमधील पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

Chetan Bodke

Shreyas Talpade-Radhika Kumaraswamy’s New Kannada Film: मराठीसह बॉलिवूडमध्ये आणि आता साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक सध्या श्रेयस तळपदे आपल्या चाहत्यांना दाखवतो आहे. त्याच्या आवाजाची वेगळीच धमक आपण ‘पुष्पा: द रूल’ पाहिली. आपल्या आवाजातून ओळख निर्माण केलेला श्रेयस आता लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. त्याचा हा टॉलिवूडमधील पहिला वहिला चित्रपट असून त्याने या नव्या प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियावरून दिली.

‘गोलमाल’, ‘कौन प्रविण तांबे’ सह काही चित्रपटांतून त्याने आपली झलक बॉलिवूडमध्ये दाखवली असून त्याची मराठी टेलिव्हिजनवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बरीच गाजली. त्यातील त्याच्या अभिनयाची आणि लूकची बरीच चर्चा झाली होती. मराठी आणि बॉलिवूडमध्ये अभिनय केल्यानंतर लवकरच मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

प्रत्येकासाठी पहिली गोष्ट नेहमीच खास असते. तसंच श्रेयससाठी सुद्धा त्याची पहिली साऊथ फिल्म ही खूप खास असणार आहे. त्याचा हा पहिला कन्नड चित्रपट असून त्याचे ‘अजग्रथा’ असे नाव आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांसोबत टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम शशिधर यांनी केला असून चित्रपटाची कथा सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर सारखी आहे. त्याच्यासोबत ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री राधिका कुमारदेखील झळकणार आहे. चित्रपटाची कथा ‘ब्लू व्हेल’ या भयंकर गेमवर आधारित असल्याची चर्चा होत आहे.

श्रेयसने चित्रपटाबद्दल माहिती सांगताना पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझा पहिला दाक्षिणात्य चित्रपट, तुम्ही मला दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी डबिंगसाठी एवढे प्रेम दिले, आता तुम्ही मला दमदार दाक्षिणात्य चित्रपटात हिरोच्या भूमिकेत पाहू शकणार आहेत. नवीन सुरुवात, नेहमी आभारी राहीन.’ श्रेयसने त्याच्या अकाऊंटवर राधिका सोबतच चित्रपटाच्या इतर टीमसोबत ही फोटो शेअर केले आहेत. त्याने केलेल्या या पोस्टनंतर अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

काही दिवसांपुर्वी श्रेयसने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली होती. ‘अजग्रथा’ या कन्नडा चित्रपटापुर्वी ‘द गेम ऑफ गिरगिट’ ची सुद्धा घोषणा करण्यात आली होती. सोबतच श्रेयसने गेल्या काही दिवसांपुर्वी ‘पोश्टर बॉईज २’ या चित्रपटाची देखील घोषणा केली होती. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पोश्टर बॉईज’ चा हा सिक्वेल असून यामध्ये श्रेयस तळपदेसोबत, अनिकेत विश्वासराव, दिलीप प्रभावळकर आणि हृषिकेश जोशी हे कलाकार दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र समितीची बैठक, मनोज जरांगेंना निमंत्रण, तोडगा निघणार का?

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कोकणात भाजपची मोर्चेबांधणी

Success Story: इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; २५व्या वर्षी IAS झालेले प्रतिक जैन आहेत तरी कोण?

Thursday Horoscope: गुरुचा आशीर्वाद लाभणार; ५ राशींना होणार धन लाभ, अडचणी होतील दूर; कसा असणार गुरुवारचा दिवस जाणून घ्या

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

SCROLL FOR NEXT