Priyanka With Malati Merry: प्रियंका- मालतीने केली अमेरिकेच्या रस्त्यावर पायी सफर; निक जोनासने शेअर केला खास व्हिडिओ

Priyanka Viral Video: निक जोनसने मदर्स डे निमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
Priyanka Chopra With Malati Merry
Priyanka Chopra With Malati MerryInstagram @nickjonas

Nick Jonas Share Mothers Day Special Post: भिनेत्री प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरी नेहमीच चर्चेत असतात. प्रियांका मालतीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. परंतु आता निकने माय-लेकीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

निक जोनसने मदर्स डे निमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निकने मालती आणि प्रियांकाच्या फोटोसह व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या मध्ये प्रियांका मुलीसह रस्ता क्रोस करत आहे. (Latest Entertainment New)

Priyanka Chopra With Malati Merry
Kapil Sharma's Ramp Walk With Daughter: कपिल-भारतीचा मुलांसह रॅम्पवॉक: व्हिडिओ व्हायरल

प्रियंकाने लेक मालतीला उचलून धरले आहे आणि ती मालतीसह रस्ता क्रॉस करत आहे. मालती या व्हिडिओमध्ये आई प्रियांकासोबत खुप एक्साईटेड दिसत आहे. हा क्युट व्हिडिओ निकने शूट केला आहे. या व्हिडिओमलाई टायगर प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहे.

निकने त्याच्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'मदर्स डेच्या शुभेच्छा प्रिय प्रियांका. तू एक अविश्वसनीय आई आहेस. तू माझे आणि मालती मेरीचे जग दररोज उजळता.' त्याच्या या पोस्टवर प्रियंकाने कमेंट केली आहे. तिने लिहिले आहे की, 'आय लव्ह यू जान. मला आई बनविल्याबद्दल धन्यवाद'

तसेच निकने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्याच्या आईला आणि सासूला देखील मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांका नुकतीच दिल्लीत आली होती. शनिवारी परिणीती आणि राघव चड्ढाच्या साखरपुड्याला तिने हजेरी लावली होती. तर काही दिवसांपूर्वी तिची सिटाडेल ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. तर मुलीसाठी करियर देखील सोडायला प्रियांका तयार असल्याची चर्चा आहे.

तसेच प्रियंकाने देखील पोस्ट शेअर करत तिच्या आईचे मदर्स डे निमित्त आभार मानले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com