Shraddha Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor : 'घर चकचकीत करणार...' 'स्त्री'च्या घरी दिवाळीची तयारी सुरू; श्रद्धा स्वतः करणार साफसफाई, म्हणाली...

Shraddha Kapoor Video : बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर दिवाळीच्या साफसफाईवर पापाराझीशी गप्पा मारताना दिसली. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडची 'स्त्री' नेहमी तिच्या लूक्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'स्त्री 2' सध्या खूप गाजत आहे. या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाने श्रद्धाला खूप यश मिळवून दिले आहे. आता तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते उत्सुक आहेत.

अलिकडेच श्रद्धाला पापाराझींनी एअरपोर्टवर स्पॉट केले. तेव्हा पापाराझींनी तिच्याशी संवाद साधला. ज्यात तिने दिवाळीच्या साफसफाईबद्दल सांगितले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

तुम्ही पाहू शकता की, श्रद्धा कपूर एअरपोर्टवरून बाहेर येताना एका पापाराझी तिच्याशी संवाद साधतो. हा संवाद मराठीत होत आहे. त्यामुळे तो अधिक मनोरंजक वाटत आहे. एक पापाराझी श्रद्धा म्हणतो की, "मी घरी जाऊन दिवाळीची साफसफाई करणार आहे." त्यावर श्रद्धा म्हणते, "तुमची दिवाळीची साफसफाई सुरू झाली का?" पुन्हा उत्तर देत पापाराझी म्हणतात की, "माझ्या घरी दिवाळीची साफसफाई आणि फराळाची तयारी सुरू झाली आहे." यावर आता श्रद्धा विचारते की, "घर आता चकाचक करणार?" यावर पापाराझी श्रद्धाला विचारतो की, "तुमचा दिवाळीचा काय प्लान आहे?" तेव्हा श्रद्धा म्हणते की, "आता सगळं सुरू करायचं आहे, खूप कामं आहेत. साफसफाई करायची आहे"

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या विविध लूकचे, खाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते. श्रद्धाच्या लूकवर चाहते नेहमीच घायाळ होतात. तसेच तिने अनेक हिट चित्रपट केले आहे. आपल्या अभिनयाने आणि मनमोकळ्या स्वभावाने तिने अनेकांचे मन जिंकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT