Chetan Bodke
बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या खास अंदाजातील फोटोंची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते.
नुकतंच श्रद्धाने 'सकाळ सन्मान पुरस्कार सोहळा २०२४' ला उपस्थिती लावली होती. यावेळी तिने खास आऊटफिट करीत सर्वांचेच लक्ष वेधला.
यावेळी श्रद्धाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करीत तिने खूप सुंदर फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
कानामध्ये झुमका, डोक्यावर टिकली आणि अगदीच साधा सिंपल मेकअप असा तिने लूक केलेला दिसतोय.
अभिनेत्रीच्या ह्या ड्रेसवर फुलांची डिझाईन दिसत आहे.
अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना, "सुंदर दिसते का, लग्न करू का ?" असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे.
अभिनेत्रीच्या ह्या फोटोची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
श्रद्धाच्या या कॅप्शनवर अनेकांनी 'हो' म्हटलं आहे, तर काहींनी 'कधी लग्न करतेय ?', असाही तिला प्रश्न विचारला.
श्रद्धाच्या ह्या खास आऊटफिटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.