Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने स्वतःला एक नवीन अल्ट्रा-लक्झरी लेक्सस LM 350h भेट म्हणून दिली आहे. ही कार अंदाजे 2.93 कोटी रुपयांची आहे. ही कार ग्रॅफाइट ब्लॅक रंगात आहे. यापूर्वीच तिच्याकडे 4.04 कोटी रुपये किंमतीची लॅम्बोर्गिनी हुराकान टेक्निका आहे. आता या नवीन कारमुळे तिची गाड्यांबद्दलची आवड चाहत्यांना समजली आहे.
श्रद्धाकडे आहे कोट्यवधींची संपत्ती
श्रद्धा कपूरकडे एकूण 123 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज आहे, यामध्ये तिच्या चित्रपटांची कमाई आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. तिच्या सर्वात महागड्या वस्तूंमध्ये तिच्या कार व्यतिरिक्त, मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनारी असलेले घर आहे, जे तिचे वडील शक्ती कपूर यांनी सुरुवातीला 7 लाख रुपयांना खरेदी केले होते आणि आता त्याची किंमत 60 कोटी रुपये आहे. याशिवाय, तिने आणि तिच्या वडिलांनी जानेवारी 2025 मध्ये मुंबईतील पिरामल महालक्ष्मी साउथ टावरमध्ये 6.24 कोटी रुपयांचा एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केला आहे.
श्रद्धाची गाडी
श्रद्धाच्या कार संग्रहात आता लेक्सस LM 350h आणि लॅम्बोर्गिनी हुराकान टेक्निका यांचा समावेश आहे. लेक्सस LM 350h ही एक 4-सीटर अल्ट्रा-लक्झरी कार आहे, ज्याची किंमत लेक्ससच्या अधिकृत संकेतस्थळानुसार मुंबईत 2.93 कोटी रुपये आहे.
श्रद्धाचे चित्रपट
कामाबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा कपूर अलीकडेच 'स्त्री 2' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसली होती, यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली उत्तम कलेक्शन केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.